सुरजची आई झाली इमोशनल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 15:47 IST2016-06-30T10:17:56+5:302016-06-30T15:47:56+5:30

सुरज पांचोलीची आई आणि अभिनेत्री झरीना वहाब आपल्या मुलाच्या एका दुख:द आठवणीने भावनिक झाल्या. नुकतेच त्यांनी एका म्युझिक व्हिडिओमध्ये ...

Suraj's mother was emotive | सुरजची आई झाली इमोशनल

सुरजची आई झाली इमोशनल

>सुरज पांचोलीची आई आणि अभिनेत्री झरीना वहाब आपल्या मुलाच्या एका दुख:द आठवणीने भावनिक झाल्या.

नुकतेच त्यांनी एका म्युझिक व्हिडिओमध्ये तापसी पन्नूच्या आईच्या भूमिका साकारली. याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, हा व्हिडिओ पाहून सुरज अत्यंत आनंदी झाला. शुटिंग झाल्यावरच मी त्याला याबद्दल सांगितले.

प्रथमच अशा व्हिडिओमध्ये काम करत असल्यामुळे फार छान वाटले; परंतु स्क्रीप्टमधील अ‍ॅक्सिडेंट सीनमुळे मी फार भावनिक झाले. आम्ही

२०११ साली गोव्यात सुरजच्या बाईकचा खूप मोठा अपघात झाला होता. जखमी अवस्थेत तो रस्त्यावर सुमारे अर्धा तास तसाच पडून होता.
कोणीच त्याची मदतीला समोर आले नाही.

तो प्रसंग आठवला की, आजही माझ्या डोळ्यात पाणी येते. मी तर प्रार्थनाच करते की, कोणत्याच आईवडिलांच्या आयुष्यात असा दिवस येऊ नये.

Web Title: Suraj's mother was emotive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.