सूरज बडजात्या म्हणतात, कौटुंबिक चित्रपटांची निर्मिती आव्हानात्मक गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 19:53 IST2017-02-18T14:21:28+5:302017-02-18T19:53:28+5:30
चित्रपट निर्माते सूरज बडजात्या हे कौटुंबिक चित्रपट निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या २५ वर्षांपासून ते चित्रपट निर्मिती क्षेत्रात आहेत. ...

सूरज बडजात्या म्हणतात, कौटुंबिक चित्रपटांची निर्मिती आव्हानात्मक गोष्ट
च त्रपट निर्माते सूरज बडजात्या हे कौटुंबिक चित्रपट निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या २५ वर्षांपासून ते चित्रपट निर्मिती क्षेत्रात आहेत. त्यांच्या मते कौटुंबिक चित्रपटांची निर्मिती ही खूप आव्हानात्मक गोष्ट आहे.
बडजात्या म्हणाले, ‘राजश्री प्रॉडक्शन्सच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रकारच्या चित्रपटांची निर्मिती केली. आम्ही आधुनिक चित्रपट, अॅक्शन चित्रपट निर्माण केले. अगदी डाकूंचे देखील चित्रपट केले. परंतु कौटुंबिक चित्रपटासारखे कोणतेच चित्रपट फारसे चालले नाहीत.’
![]()
आमच्या आता लक्षात आले आहे की, आम्ही काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करीत नाही. लोक आमच्या बॅनरकडून चांगल्या कौटुंबिक चित्रपटाची अपेक्षा करतात. मला वाटते हे आमचे वैशिष्ट्य आहे.’
सूरज बडजात्या यांनी आतापर्यंत मैने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ है, प्रेम रतन धन पायो असे चित्रपट केले. लोकांचा जेंव्हा चित्रपट पाहण्याचा मूड असतो, त्यावेळी ते आमचे काम पाहतात.ं जसजसे माझे वय वाढते आहे, त्याचवेळी आमची अशा पद्धतीचे चित्रपट काढण्याची जबाबदारी अधिक वाढली आहे. सध्या कौटुंबिक चित्रपट हे दुर्मिळ झाल्याने असे चित्रपट तयार करायला हवे आहेत. हे खरे आव्हान आहे. सध्याच्या युवकांना चांगल्या मूल्यांची जाणीव करून देणे आवश्यक आहे.’
![]()
पिया अलबेला याविषयी त्यांनी सांगितले, गेल्या आठ वर्षांपासून आम्ही यावर काम करीत आहोत. ज्यावेळी मी विश्वामित्र आणि मेनका यांच्यासंदर्भात वाचण्यास सुरूवात केली, त्यावेळी मला वाटले होते की, मेनकेचे पात्र खूप वाईट आहे. ती येते आणि विश्वामित्रांची तपस्या भंग करते. परंतु मी ही कथा वाचली त्यावेळी लक्षात आले की, ती विश्वामित्रांच्या प्रेमात होती.’ अर्थात ही कथा विश्वामित्र आणि मेनकेच्या कथेवर आधारित नाही. हे पात्र माझ्या अगदी जवळचे आहे. पिया अलबेलाचे विश्वामित्र आणि मेनका यांच्यासंदर्भात काहीही देणेघेणे नाही. त्यांना ती श्रद्धांजली आहे.’
पिया अलबेलावर चित्रपट का काढला नाही, या प्रश्नावर बडजात्या म्हणाले, ‘आपण ज्यावेळी आकडेवारीचा विचार करू, त्यावेळी टी. व्ही. इंडस्ट्री ही चित्रपट उद्योगापेक्षा खूप मोठी आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात. भारतीय समाजाचा एक भाग म्हणून टी. व्ही. कडे पाहता येईल. सध्या चित्रपट पाहणे हे खूप महाग झाल्याने टी. व्ही. पाहणे हेच परवडते.’
सध्या सॅटेलाईटवरही चित्रपट चांगला व्यवसाय करीत आहेत. अनेक तंत्रज्ञ, अभिनेते आणि लेखकांना याचा फायदा झाला आहे. या उद्योगामुळे चांगला रोजगारही उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.