‘या’ सुपरस्टारला बघण्यासाठी गर्दी झाली बेभान; मैदानावरून काढावा लागला पळ, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 18:37 IST2018-06-15T13:07:51+5:302018-06-15T18:37:58+5:30

‘हा’ सुपरस्टार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला असता, त्याला बघण्यासाठी इतकी गर्दी झाली होती की, त्याने मैदानावरूनच पळ काढला.

The 'superstar' was crowded to see the crowd; From the field, the time to be removed, watch the video! | ‘या’ सुपरस्टारला बघण्यासाठी गर्दी झाली बेभान; मैदानावरून काढावा लागला पळ, पाहा व्हिडीओ!

‘या’ सुपरस्टारला बघण्यासाठी गर्दी झाली बेभान; मैदानावरून काढावा लागला पळ, पाहा व्हिडीओ!

जपुरी चित्रपटातील सुपरस्टार दिनेश लाल यादव निरहुआ सध्या त्याच्या ‘बॉर्डर’ या भोजपुरी चित्रपटाचा जोरदार प्रचार करीत आहे. निरहुआ सध्या बिहारमध्ये त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करीत आहे. ‘बॉर्डर’ हा ईदनिमित्त प्रदर्शित होत आहे. निरहुआ काल प्रमोशनसाठी बिहारच्या मोतिहारी येथे गेला होता. ‘बॉर्डर’च्या प्रमोशनसाठी याठिकाणी निरहुआ आपल्या संपूर्ण टीमसोबत एक क्रिकेट मॅच खेळत होता. निरहुआ ज्याठिकाणी जातो त्याठिकाणच्या स्थानिक टीमसोबत तो मॅच खेळत असतो. या मॅचमध्ये त्याच्या टीमने स्थानिक टीमचा पराभव केला. परंतु नंतर त्याच्या संघापेक्षा चाहत्यांनीच असा काही जल्लोष केला की, त्याला मैदान सोडून पळून जावे लागले. 

निरहुआसोबत हा मजेशीर किस्सा काल घडला. तो मोतिहारी मॅचमध्ये खेळण्यासाठी गेला होता. परंतु आपल्या आवडत्या जुबली स्टारला बघण्यासाठी लोकांनी अशी काही गर्दी केली, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कोणालाच शक्य झाले नाही. गर्दी अशी काही बेभान झाली होती की, मॅच अर्ध्यातच थांबवावी लागली. तसेच निरहुआला तेथून अक्षरश: पळ काढावा लागला. निरहुआने आपल्या इन्स्टाग्रामवर लिहिले की, ‘प्रेम आणि पाठिंब्यासाठी मोतिहारींचे आभार. गर्दीमुळे मॅच पूर्ण होऊ शकली नाही. परंतु प्रेम आणि आशीर्वाद मिळवून ‘बॉर्डर’ची टीम धन्य झाली. असाच आशीर्वाद असू द्या.’
 

दरम्यान, निरहुआने त्याच्या चित्रपटासाठी ईदची निवड केली आहे. याच दिवशी सलमान खानच्या ‘रेस-३’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे निरहुआने चक्क बॉलिवूडचा सुलतान सलमान खानशी टक्कर घेतली आहे. ‘बॉर्डर’मध्ये निरहुआ व्यतिरिक्त आम्रपाली दुबे, विक्रांत सिंह राजपूत, शुभी शर्मा आणि परवेश लाल यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असून, त्यामध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स बघावयास मिळणार आहे. 

Web Title: The 'superstar' was crowded to see the crowd; From the field, the time to be removed, watch the video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.