रोड शोदरम्यान कारवरून खाली पडताना थोडक्यात बचावला Pawan Kalyan, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 11:30 AM2022-02-21T11:30:57+5:302022-02-21T11:31:06+5:30

Pawan Kalyan : पवन कल्याणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात तो एका रॅली दरम्यान कारवर चढून लोकांना हात दाखवत आहे. पण यावेळी अचानक तो कारवरच पडला.

Superstar Pawan Kalyan falls on car during rally video goes viral | रोड शोदरम्यान कारवरून खाली पडताना थोडक्यात बचावला Pawan Kalyan, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

रोड शोदरम्यान कारवरून खाली पडताना थोडक्यात बचावला Pawan Kalyan, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

साऊथ सिने इंडस्ट्रीतील सुपरस्टार आणि जनसेना पक्षाचा प्रमुख अभिनेता पवन कल्याण (Pawan Kalyan) भापजासोबत युती करून २०२४ च्या निवडणुकीची तयारी करत आहे. सध्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. अशात पवन कल्याणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात तो एका रॅली दरम्यान कारवर चढून लोकांना हात दाखवत आहे. पण यावेळी अचानक तो कारवरच पडला.

पवन कल्याणने हा व्हिडीओ जनसेना मिशन २०२४ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघायला मिळतं की, अभिनेता रॅली दरम्यान कारवर चढतो आणि लोकांना हात दाखवतोय. यावेळी अचानक एक व्यक्ती त्याच्याजवळ येतो आणि तो त्याच्या गळ्यात हात टाकून काहीतरी बोलू लागतो. तेव्हाच अभिनेता खाली पडतो. सुदैवाने तो कारखाली पडण्यापासून बचावला. 

सोशल मीडियावर पवन कल्याणचा हा व्हिडीओ समोर आल्यावर अनेक लोक त्यावर कमेंट करत आहेत. जी व्यक्ती पवन कल्याणजवळ आली होती ती कोण आहे याची माहिती लोक विचारत आहेत. ज्यामुळे ही घटना झाली. मात्र, यावेळी सुदैवाने पवन कल्याण वाचला. नाहीतर मोठी दुर्घटना झाली असती.

पवन कल्याणच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर त्याच्या आगामी 'भीमला नायक' सिनेमाची चांगलीच चर्चा होत आहे. यात तो पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबतच या सिनेमात राणा दग्गुबाती, नित्या मेनन आणि संयुक्ता मेनन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन सागर के चंद्रने केलं आहे. २५ फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
 

Web Title: Superstar Pawan Kalyan falls on car during rally video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.