सनीच्या आयुष्यावर येणार बायोपिक!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 18:06 IST2016-07-27T12:36:04+5:302016-07-27T18:06:04+5:30
पॉर्न इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी हिच्या आयुष्यातील अनेक रहस्ये उघड होणार आहेत. होय,सनीच्या आयुष्यातील ...
.jpg)
सनीच्या आयुष्यावर येणार बायोपिक!!
प र्न इंडस्ट्रीमधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी हिच्या आयुष्यातील अनेक रहस्ये उघड होणार आहेत. होय,सनीच्या आयुष्यातील अनेक रहस्ये जाणून घेण्यात लोकांना स्वारस्य आहे आणि म्हणूनच सनीच्या आयुष्यावर बायोपिक येणार असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सनी स्वत:च या चित्रपटात काम करणार आहे. सनीचे आयुष्य अनेक चढऊतारांनी भरलेले आहे तेवढेच ते ‘बोल्ड’ आहे. तिच्या ‘बोल्ड’ आयुष्यावर बायोपिक बनवणे तसे सोपे नाहीच. पण दिग्दर्शकअभिषेक शर्मा यांनी हे आव्हान स्वीकारल्याचे समजते. सनी व सनीचा पती डेनियल वेबर हे चित्रपटाचे निर्माते असतील.एकंदर इमोशन, ड्रामा, कॉमेडी असे सगळेच या बायोपिकमध्ये असणार आहे. हा चित्रपट सनीच्या डॉक््यूमेंटीपेक्षा एकदम वेगळा असेल.