सनी बनली ‘मोस्ट सर्च पर्सनॅलिटी’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 17:16 IST2016-12-02T17:16:08+5:302016-12-02T17:16:08+5:30

सनी लिओनी ही बॉलिवूडची सर्वांत हॉट अ‍ॅण्ड सेक्सी अभिनेत्री म्हणून ओळखली जातेय. तिची अदा अनेक अभिनेत्यांना मोहून टाकते. तिच्यासोबत ...

Sunny made 'Most Search Personality'! | सनी बनली ‘मोस्ट सर्च पर्सनॅलिटी’ !

सनी बनली ‘मोस्ट सर्च पर्सनॅलिटी’ !

ी लिओनी ही बॉलिवूडची सर्वांत हॉट अ‍ॅण्ड सेक्सी अभिनेत्री म्हणून ओळखली जातेय. तिची अदा अनेक अभिनेत्यांना मोहून टाकते. तिच्यासोबत चित्रपटात काम करण्याची अनेक अभिनेत्यांची इच्छा असते. आता तर ती चाहत्यांचीही फेव्हरेट बनली आहे. तुम्हाला माहितीये का? सनी ही २०१६ वर्षातील गुगलवर सर्वांत जास्त सर्च करण्यात येणारी अभिनेत्री बनली आहे. एका सर्च इंजिनद्वारे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सलमान खान यांच्यापेक्षा जास्त सर्च करण्यात आलेल्या व्यक्तीचा मान सनीला मिळालाय. 



‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे २०१६ च्या पुरूष सेलिब्रिटी वर्गात सर्वांत जास्त सर्च करण्यात येणारी व्यक्ती म्हणून सलमान खानची निवड झाली आहे. दुसऱ्या  क्रमांकावर कुणी खान नसून स्टँण्ड अप कॉमेडियन आणि टीव्ही पर्सनॅलिटी कपिल शर्मा हा आहे. त्यानंतर अमिताभ बच्चन, शाहरूख खान आणि आमिर खान यांची निवड करण्यात आली आहे. बिपाशा बासुचे करणसिंग ग्रोव्हरसोबत लग्न झाल्यानंतर ती स्त्री वर्गात दुसऱ्या  क्रमांकावर सर्च करण्यात आलेली अभिनेत्री आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर दीपिका पादुकोण, चौथ्या क्रमांकावर कॅटरिना कैफ हिची निवड करण्यात आली आहे. 



दरवर्षी एखाद्या सर्च इंजिनकडून भारतातील मोस्ट सर्चिंग व्यक्तींची अशी निवड करण्यात येते. यंदा सनी लिओनीला सर्वांत जास्त सर्च करण्यात आले. बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओनी हिला मिळालेला हा क्रमांक किती वर्ष अशीच कायम ठेवते? हे आता कळेलच. 

Web Title: Sunny made 'Most Search Personality'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.