सनी लियोनचा बायोपिक वेब सीरिज झाला लीक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 05:02 PM2018-07-23T17:02:18+5:302018-07-23T17:08:33+5:30

पॉर्नस्टार ते बहुचर्चित बॉलिवूड अभिनेत्री असा सनीचा प्रवास तिच्या बायोपिक वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे.

 Sunny Leone's biopic web series leaked | सनी लियोनचा बायोपिक वेब सीरिज झाला लीक

सनी लियोनचा बायोपिक वेब सीरिज झाला लीक

googlenewsNext
ठळक मुद्देसनीचे बॉलिवूडमध्ये येण्याआधी नाव होते करणजीत कौर सनी करतेय 'वीरमादेवी' या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण


अभिनेत्री सनी लियोनचा बायोपिक वेब सीरिज 'करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन'ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ही वेब सीरिज लीक झाल्याची माहिती समोर येत आहे. तमीळ रॉकर्स या दाक्षिणात्य चित्रपटांच्या वेबसाइटवर सनीचा बायोपिक लीक झाला आहे. 

झी 5वर १६ जुलै रोजी 'करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली. पॉर्नस्टार ते बहुचर्चित बॉलिवूड अभिनेत्री असा सनीचा प्रवास तिच्या बायोपिक वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आला आहे. सनीचे बॉलिवूडमध्ये येण्याआधी नाव करणजीत कौर होते. आदित्य दत्त दिग्दर्शित करत असलेल्या या बायोपिकमध्ये १४ वर्षीय रसा सौजनी सनीच्या बालपणीची भूमिका वठवली आहे.
दाक्षिणात्य चित्रपटांसाठी तमीळरॉकर्स ही वेबसाइट प्रसिद्ध आहे. याआधी बरेच पायरेटेड वेब सीरिज आणि चित्रपट या साइटवर लीक झाल्याची तक्रार आहे. नुकतीच प्रदर्शित झालेली अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांची 'सेक्रेड गेम्स' ही वेब सीरिजसुद्धा या साइटवर लीक झाली होती. इतकंच नव्हे तर रजनीकांत यांच्या ‘काला’ चित्रपटाचे एचडी व्हर्जन तमीळरॉकर्सवर लीक झाले होते. या वेबसाइटच्या सदस्यांवर कारवाई करण्यात आली असूनही अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. मार्चमध्ये केरळच्या अँटी पायरसी सेलने या वेबसाइटच्या तीन सदस्यांना अटक केली होती. स्थानिक पातळीवरून होणाऱ्या पायरसीचा शोध घेण्यातही पोलिसांना अपयश येत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. पोलीस यंत्रणाच नव्हे तर सरकारच्या दृष्टीनेही पायरसी रोखणे प्राथमिकता नसल्याने चित्रपटांना भविष्यातही असाच फटका बसत राहील, अशी प्रतिक्रिया चित्रपटसृष्टीकडून व्यक्त होत आहे.
सनी लियोन भारतात सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रेटींपैकी एक आहे. सनी 'वीरमादेवी' या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. या सिनेमात ती वीरमादेवीची मुख्य भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. वीरमादेवी एक यौद्धा राजकुमारी असणार आहे. 

Web Title:  Sunny Leone's biopic web series leaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.