​‘लैला ओ लैला’साठी सनी लिओनला मिळाली ४ कोटीची आॅफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 20:50 IST2016-12-16T20:50:48+5:302016-12-16T20:50:48+5:30

Sunny Leone offered a whopping amount to perform live on song ‘Laila O Laila’ ; रईसमध्ये ‘लैला ओ लैला’या गाण्यावर आयडम डान्स केला आहे. या चित्रपटातील ‘आयटम डान्स’च्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी सनीला ४ कोटी रुपयांची आॅफर करण्यात आली आहे.

Sunny Leone has received 4 crores for 'Layla o Laila' | ​‘लैला ओ लैला’साठी सनी लिओनला मिळाली ४ कोटीची आॅफर

​‘लैला ओ लैला’साठी सनी लिओनला मिळाली ४ कोटीची आॅफर

ong>बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट ‘रईस’च्या चांगल्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. ‘रईस’च्या ट्रेलरमध्ये बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनी हिचा डान्स नंबरची एक झलक पहायला मिळाली होती. सनीने रईसमध्ये ‘लैला ओ लैला’या गाण्यावर आयडम डान्स केला आहे. या चित्रपटातील ‘आयटम डान्स’च्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी सनीला ४ कोटी रुपयांची आॅफर करण्यात आली आहे. 

‘रईस’च्या ट्रेलरमध्ये सनी लिओनच्या आयटम साँगची केवळ एक झलक दाखविण्यात आली होती. सनीचा ‘रईस’मधील हा डान्स कसा असेल हे पाहण्यासाठी तिला याच गाण्यावर लाईव्ह परफॉर्मन्स करण्याचा आॅफर देण्यात आला आहे. ख्रिसमस व न्यू ईअर हे दोन महत्त्वाचे फेस्टिव्हल डोळ्यासमोर ठेवून एका सबअर्ब हॉटलने सनी लिओनला ४ कोटी रुपये देत ‘लैला ओ लैला’ या गाण्यावर हॉटेलमध्ये आलेल्या पाहुण्यांसाठी लाईव्ह परफॉर्मन्स करावा असा आॅफर दिला आहे. 



फेस्टिव्हल पार्टीमध्ये लाईव्ह परफॉर्मन्सला मोठी मागणी असते, त्याशिवाय पार्टीत जान येत नाही असाही एक समज आहे. यामुळे आयोजकांनी सनीला डान्स नंबरचा आॅफर दिला आहे, यामुळे त्यांच्या हॉटेलातील पार्टीची शान वाढेल असे त्यांना वाटते. ‘रईस’च्या ट्रेलरमधील ‘लैला ओ लैला’ हे गाणे धमाकेदार पार्टी साँग असल्याचे आयोजकांना वाटत असल्याचेही सांगण्यात येते. सनीने यापूर्वी केलेले परफॉर्मन्स जबरदस्त हिट ठरले आहेत. ‘रईस’मधील हे गाणे देखील प्रदर्शनापूर्वीच किती हिट ठरले आहे याचा अंदाज यावरून लावता येतो. 

रईसचा ट्रेलर लाँच झाल्यापासून यूट्युबवर सुमारे २७ लाख लोकांनी पाहिला आहे. २०१६ साली आतापर्यंत सर्वाधिक पाहण्यात आलेला हा ट्रेलर ठरला आहे. राहुल ढोलकिया दिग्दर्शित शाहरुख खान, नवाजुद्दीन सिद्दीकी व माहिरा खान यांची प्रमुख भूमिका असणारा रईस हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. 


Web Title: Sunny Leone has received 4 crores for 'Layla o Laila'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.