​‘नवरात्री स्पेशल’ कंडोम जाहिरातीवर अखेर सनी लिओनीने उघडले तोंड; वाचा, काय दिले उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 12:53 IST2017-10-24T07:23:23+5:302017-10-24T12:53:23+5:30

नुकत्याच संपलेल्या नवरात्रात पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा फार मोठा टप्पा गाठणारी सनी लिओनी जाम चर्चेत आली होती. ...

Sunny Leone finally opens her mouth on 'Navratri Special' condom advertisement; Read, what answer given !! | ​‘नवरात्री स्पेशल’ कंडोम जाहिरातीवर अखेर सनी लिओनीने उघडले तोंड; वाचा, काय दिले उत्तर!!

​‘नवरात्री स्पेशल’ कंडोम जाहिरातीवर अखेर सनी लिओनीने उघडले तोंड; वाचा, काय दिले उत्तर!!

कत्याच संपलेल्या नवरात्रात पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा फार मोठा टप्पा गाठणारी सनी लिओनी जाम चर्चेत आली होती. विशेषत: गुजरातमध्ये सनीची मोठ मोठी होर्डिंग लागली होती. अर्थात ही होर्डिंग एका जाहिरातीचा भाग होती. जाहिरात होती, कंडोमची. या जाहिरातीच्या होर्डिंगवर सनीचा क्वीवेज दाखवणारा फोटो होता. सोबत होत्या दोन दांडिया स्टिक आणि त्यामध्ये ‘इस नवरात्रि खेलो, मगर प्यार से,’ असे लिहिलेले होते. अर्थात हे वाक्य द्विअर्थी होते. कंडोमच्या प्रचार-प्रसारासाठी वापरतात अगदी तसे द्विअर्थी. मग काय? या जाहिरातीवरून उठायचे ते वादळ उठले होते. काही हिंदूत्ववादी संघटना सनीच्या या होर्डिंगविरोधात गुजरातच्या रस्त्यांवर उतरल्या होत्या. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या जाहिरातीच्या होर्डिंगविरोधात तीव्र रोष व्यक्त करत, सनीला भारताबाहेर हाकलून देण्याची मागणी केली होती. सोशल मीडियावरही सनी व तिच्या या जाहिरातीविरोधात संताप बघायला मिळाला होता. कंडोम विकण्याआधी नवरात्री काय आहे ते समजून घे, असा सल्ला सनीला अनेकांनी दिला होता. 



आत्तापर्यंत सगळ्या वादावर बोलणे सनीने टाळले होते. पण ताज्या मुलाखतीत मात्र ती या संपूर्ण एपिसोडवर बोललीच. कंडोम जाहिरातीच्या या सर्व वादाबद्दल विचारले असता सनी जाम वैतागलेली दिसली. ‘तुम्हाला ठाऊक आहे, सेलब्रिटी हे सर्वाधिक सॉफ्ट टार्गेट आहे.   पण खरे सांगायचे तर मला यामुळे काहीही फरक पडत नाही. मला आयुष्य आहे आणि आयुष्यात माझी काही ध्येय आहेत. माझे एक आनंदी कुटुंब आहे. आयुष्यात मला जे हवे होते, ते सगळे माझ्याकडे आहे. त्यामुळे अशा वादांचा माझ्यालेखी काहीही अर्थ नाही,’असे सनी यावर म्हणाली. एकंदर काय तर सनी या वादावर थेट काही बोलली नाही. पण अप्रत्यक्षपणे ती बरेच काही बोलून गेली. सनीच्या या मताबद्दल तुम्हाला काय वाटते, ते जरूर कळवा. 

ALSO READ: दोन वर्षांची झाली सनी लिओनीची लेक निशा, अमेरिकेत केला वाढदिवस साजरा !

सनी लिओनी लवकरच अरबाज खानसोबत ‘तेरा इंतजार’ या चित्रपटात दिसणार आहे. अलीकडे रिलीज झालेल्या अजय देवगणच्या ‘बादशाहो’ व संजय दत्तच्या ‘भूमी’ या चित्रपटात सनी आयटम साँग करताना दिसली होती.

Web Title: Sunny Leone finally opens her mouth on 'Navratri Special' condom advertisement; Read, what answer given !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.