video viral: बोलो तारा रारा...! विमानतळावर सनी लिओनीचा भन्नाट भांगडा!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 18:36 IST2018-09-16T18:34:02+5:302018-09-16T18:36:14+5:30
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी चित्रपटांपेक्षा अधिक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. सनी सर्रास आपल्या सोशल अकाऊंट असे काही व्हिडिओ शेअर करते की, ते व्हायरल व्हायला जराही वेळ लागत नाही. असाच एक नवा व्हिडिओ सनीने शेअर केला आणि काहीच तासांत तो व्हायरल झाला.

video viral: बोलो तारा रारा...! विमानतळावर सनी लिओनीचा भन्नाट भांगडा!!
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी चित्रपटांपेक्षा अधिक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. सनी सर्रास आपल्या सोशल अकाऊंट असे काही व्हिडिओ शेअर करते की, ते व्हायरल व्हायला जराही वेळ लागत नाही. असाच एक नवा व्हिडिओ सनीने शेअर केला आणि काहीच तासांत तो व्हायरल झाला. या व्हिडिओची खास बात म्हणजे, तो मुंबई विमानतळावरचा आहे. मुंबई विमानतळाच्या जेट ब्रिजवर सनी आपल्या टीमसोबत उभी आहे. या व्हिडिओ सनी व तिची टीम सिंगींग सुपरस्टार दलेज मेहंदी यांच्या ‘बोलो तारा रारा’ गाण्यावर थिरकताना दिसतेय. शनिवारी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आत्तापर्यंत २०लाखांवर लोकांनी पाहिले आहे. मी आणि माझी टीम कुठलाही वेडेपणा करू शकतो, असे सनीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
सध्या सनी ‘करनजीत कौर’ या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सनीच्या ख-या आयुष्यावर आधारित या सीरिजचे पहिले सीझन सुपरडुपर हिट राहिले. येत्या १८ सप्टेंबरपासून या सीरिजचा दुसरा पार्ट येतोय.
सनी लिओनी. एक वादळी अन धाडसी अभिनेत्री. तिच्या झंझावाती प्रवासावर, १८० डिग्रीतील जीवनपटावर आतापर्यंत अनेकांनी लिहिलंय. तिचा बोल्डनेस हा कायमच चर्चेचा विषय राहिलाय. तिचा भूतकाळ आणि वर्तमान यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे आणि कदाचित त्याचमुळे तिच्याबद्दलच सगळ्यांच्याच मनात एक वेगळीच उत्सुकता आहे. ती ओळखूनच, दिग्दर्शक आदित्य भट्ट घेऊन आलेत, ेएए5 वर 'करणजित कौर- द अनटोल्ड स्टोरी आॅफ सनी लिओनी' ही वेबसीरिज. सनी लिओनीचा बालपणापासूनचा प्रवास दाखवणारी ही वेबसीरिज ेएए5 या अॅपवर प्रदर्शित करण्यात आली आहे.