लॉकडाउनमध्ये मुंबईतून अमेरिकेत पोहचली सनी लिओनी, म्हणतेय माझी मुले इथेच सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 16:48 IST2020-05-11T16:48:20+5:302020-05-11T16:48:58+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सनी लिओनीला तिची मुलं अमेरिकेत जास्त सुरक्षित राहतील असे वाटतेय.

लॉकडाउनमध्ये मुंबईतून अमेरिकेत पोहचली सनी लिओनी, म्हणतेय माझी मुले इथेच सुरक्षित
बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच अभिनेत्री सनी लिओनी तिचा नवरा डेनियल वेबर व तीन मुलांसोबत लॉस अँजेलिसमध्ये पोहचली आहे. कोरोना व्हायरसची वाढता प्रादुर्भाव पाहून त्यांना वाटते की तिथे ते जास्त सुरक्षित आहेत. तिने इंस्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर केला आहे. ज्यात ते गार्डनच्या शिड्यांवर बसलेले दिसत आहेत. या फोटोत त्यांची मुलगी निशा व मुलगे नोआह व आशेर पहायला मिळत आहेत.
अमेरिकेला रवाना होण्याच्या निर्णायाबाबतचा खुलासा करत सनी लिओनीने सोशल मीडियावर लिहिले की, जगातील सर्व आईंना जागतिक मातृ दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा तुमच्या जीवनात मुले असतात. तेव्हा तुमच्या सर्व प्राथमिकतांकडे दुर्लक्ष होते. मला व डॅनिएलला ही संधी मिळाली की आम्ही मुलांना तिथे घेऊन जाऊ जिथे ते कोरोनापासून जास्त सुरक्षित राहतील. आमच्या घरापासून दूर घर लॉस अँजेलिसमध्ये आमचे सीक्रेट गार्डन आहे. मला माहित आहे की माझ्या आईची देखील हीच इच्छा असेल की मी हेच करावे. मिस यू मॉम. हॅप्पी मदर्स डे.
डेनियल वेबरने अमेरिकेत पोहचल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिलंय की, क्वारंटाइन पार्ट 2 इतकादेखील वाईट नाही. नवीन वातावरणात चांगला होतो आहे.
यापूर्वी सनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. यात तिने मुंबईत लॉकडाउनदरम्यान वर्कआऊटची एक झलक शेअर केली होती.
तिने लिहिले होते की, जेव्हा मी धावते आणि स्ट्रॉलरला धक्का देते. तेव्हा वर्कआऊट शर्टचे 10 किलोग्राम अतिरिक्त वजन वाढते. लोल लॉकडाउन लाइफ!