​बहीणीच्या लग्नासाठी कॅनडात पोहोचली सनी लिओनी! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 11:09 IST2017-11-07T05:39:57+5:302017-11-07T11:09:57+5:30

होय, कॅनडात सनी आपल्या कजिनचे लग्न एन्जॉय करतेय. नवरी बनलेल्या आपल्या चुलत बहिणीसोबतचे अनेक आनंदाचे क्षण सनीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sunny Leone arrived in Canada for sister wedding Look, photos !! | ​बहीणीच्या लग्नासाठी कॅनडात पोहोचली सनी लिओनी! पाहा, फोटो!!

​बहीणीच्या लग्नासाठी कॅनडात पोहोचली सनी लिओनी! पाहा, फोटो!!

िनेत्री सनी लिओनी कुटुंबाच्या अतिशय जवळ आहे, यात काहीही दुमत नाही. खरे तर सनी सध्या ‘तेरा इंतजार’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण इतक्या बिझी शेड्यूलमध्येही कुटुंबासाठी वेळ काढत सनी कॅनडात पोहोचलीयं. होय, कॅनडात सनी आपल्या कजिनचे लग्न एन्जॉय करतेय. नवरी बनलेल्या आपल्या चुलत बहिणीसोबतचे अनेक आनंदाचे क्षण सनीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.





सनीच्या या कजिनचे नाव दीपा नामा आहे. दीपा ही कॅनडाच्या ब्रॅम्पटन सिटीत राहते. सोमवारी दीपा लग्नबंधनात अडकली. सनीने हे लग्न जाम एन्जॉय केले. या लग्नाबद्दल सनी कमालीची एक्ससाईटेड होती. मी लहानपणापासून माझे अंकल आणि कजिनसोबत क्लोज होते. आम्ही दोघींनी खूप चांगले दिवस एकत्र घालवलेत. तिच्या लग्नात सामील होण्याची संधी मी मिस करू इच्छित नाही. हे तिच्यासाठी सरप्राईज आहे आणि या सरप्राईजनंतरचा तिच्या चेह-यावरचा आनंद टीपण्यास मी कमालीची उत्सूक आहे, असे कॅनडाला रवाना होण्यापूर्वीच सनीने म्हटले होते. सनी म्हणाली त्याप्रमाणे तिच्या बहिणीच्या चेह-यावरचा आनंद फोटोंमध्ये स्पष्ट दिसतोय.



सनीने या लग्नातील काही व्हिडिओही अपलोड केले आहेत. यात ती फन मोमेंट एन्जॉय करताना दिसतेय. बहिणीच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये सनीने अर्चना कोचरने डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये दिसली.



यात तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले होते, हे सांगणे नकोच. या फोटोत सनीचा लाडक हबी डेनिअल वेबर कुठेच नाही. कारण डेनिअलला मुंबईत आहे. होय, मुलगी निशाच्या देखरेखीसाठी डेनिअल मुंबईतच थांबला आणि सनी एकटी कॅनडाला गेली.



ALSO READ: सनी लिओनीसोबत कंडोमची जाहिरात करण्यासाठी ईशा गुप्ताची डिमांड ऐकून चकित झाले कंपनीवाले!

सनी लवकरच अरबाज खानसोबत ‘तेरा इंतजार’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची कथा ‘टार्जन द वंडर कार’शी मिळती जुळती असल्याचे सांगितले जाते. सनी अरबाजवर प्रचंड प्रेम करत असते. पण काही लोक अरबाजची हत्या करतात आणि सनीला त्रास देणे सुरु करतात. यानंतर अरबाजची आत्मा सनी लिओनीला सोबत करते आणि सगळ्यांचा सूड घेते, अशी कथा यात पाहायला मिळणार आहे.

Web Title: Sunny Leone arrived in Canada for sister wedding Look, photos !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.