न्यु इयर पार्टीत परफॉर्म करण्यासाठी सनीने घेतले तब्बल एवढे कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 17:42 IST2016-12-19T17:41:30+5:302016-12-19T17:42:06+5:30
सनी लिओनीने बिग बॉस या शोमधुन खरतर प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. या शो नंतर तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे आपो आपच ...

न्यु इयर पार्टीत परफॉर्म करण्यासाठी सनीने घेतले तब्बल एवढे कोटी
नी लिओनीने बिग बॉस या शोमधुन खरतर प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. या शो नंतर तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे आपो आपच खुले झाले. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट सीनने आजपर्यंत केले आहेत. सनीच्या चित्रपटांची चर्चा तर नेहमीच होत असते. परंतू आता सनी वेगळ््याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यापासून सनी लिओनीची चर्चा आहे. शाहरुख खानच्या आगामी रईस सिनेमातील 'लैला ओ लैला...' या गाण्यावर लाईव्ह परफार्मन्स करण्यासाठी सनीला तब्बल चार कोटींची मोठी आॅफर देण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, ख्रिसमर आणि न्यू ईयर सेलिब्रेशन लक्षात घेऊन एका हॉटेलने सनी लिओनीला लैला... या गाण्यावर परफॉर्मन्स करण्यासाठी एवढ्या मोठ्या रकमेची आॅफर दिली आहे. लाईव्ह परफॉर्मन्स हा नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनमधला महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे सनी लियोनीने या गाण्यानवर लाईव्ह परफॉर्मन्स करावा, अशी हॉटेल आयोजकांची इच्छा आहे. पण सनीने ही आॅफर स्वीकारली की नाही, हे अद्याप उघड झालेले नाही. पुढील आठवड्यात रिलीज होणारेय हे साँग... ७ डिसेंबर रोजी रईस सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला होता. प्रेक्षकांनाही ट्रेलरला पसंती दिली होती. या सिनेमातील सनीवर चित्रीत झालेले 'लैला मैं लैला' हे आयटम साँग पुढच्या आठवड्यात रिलीज करण्यात येणारेय. १९८० मध्ये रिलीज झालेल्या कुबार्नी या सिनेमात झीनत अमानवर हे गाणे चित्रीत झाले होते. आता दिग्दर्शक राहुल ढोलकियाने हे गाणे रईस या सिनेमात रिक्रिएट केले आहे. रईसमध्ये शाहरुख खान, पाकिस्तानी अॅक्ट्रेस माहिरा खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि फरहान अख्तर यांच्या मुख्य भूमिका आहेत. रईस २५ जानेवारी २०१७ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.