सनी देओलचा या चित्रपटासाठी फाडली होती जीन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:25 IST2017-10-19T09:29:30+5:302018-04-03T14:25:47+5:30
आज गदर फिल्म चा सुपरस्टार सनी देओल चा आज जन्मदिवस आहे सनी हे शांत वृत्ती चे आहेत पण एकदा ...

सनी देओलचा या चित्रपटासाठी फाडली होती जीन्स
हा किस्सा तेव्हाच आहे जेव्हा सनी देओल फिल्म डर ची शुटिंग करत होते, ह्या फिल्म मध्ये त्यांच्या बरोबर शाहरुख खान ही होते. यश चोप्रा दिग्दर्शित डर ह्या चित्रपटात शाहरुख ने जी भूमिका केली होती ते पात्र सनी देओल ला करायची इच्छा होती पण तसे होऊ शकले नाही सनी ला नकारात्मक भूमिका न देत सकारात्मक भूमिका देऊ केली त्यांना हिरो ची भूमिका करावी लागली त्यानंतर त्यांनी कधीच शाहरुख खान बरोबर काम केले नाही आणि ना ही यश राज बॅनर बरोबर काम केले. ही लढाई २४ वर्षानी संपली.
फिल्म दिग्दर्शकाने सनी ला सांगितले होते चित्रपटात तुझी भूमिका तेवढीच महत्वाची असेल जेवढी शाहरुख खान ची असणार आहे पण सनी ला वाटत होते की ह्या चित्रपटात शाहरुख ला जास्त प्राधान्य दिले गेले. काही दिवसांपूर्वी सनी ने एका मुलाखतीत म्हटले होते की डर फिल्म च्या शूटिंग च्या दरम्यान एका सिन मध्ये शाहरुख खान सनी ला चाकू मारताना दाखवला आहे पण हा सिन करताना सनी देओल ला अडचण होत होती सनी चे म्हणणे होते की शाहरुख मला कसा काय चाकू मारू शकतो मी ह्या चित्रपटात एक कमांडो ऑफिसर चा रोल करत होतो आणि शाहरुख एक वेडा आशीक आहे पण हा सिन काही बदलला नाही म्हणून सनी ने आपला राग आपल्या जीन्स पॅन्ट वर काढला रंगात त्यांनी आपली जीन्स पॅन्ट खालून फाडून टाकली होती