23 वर्षांचा तरूण मुलगा अन् वडिलांनी केलं दुसरं लग्न; अनावर झाला होता अभिनेत्याचा राग....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 07:04 PM2023-05-16T19:04:48+5:302023-05-16T19:13:06+5:30

आपली आई असताना वडील धर्मेंद्र यांचं दुसरं लग्न केल्याचं सनी देओल रागाने पेटून उठला होता. जाणून घ्या आज कसं आहे सनी देओल यांचं सावत्र आई हेमा मालिनी यांच्यासोबतचं नातं

Sunny deol was 23 years old when dharmendra got married to hema malini | 23 वर्षांचा तरूण मुलगा अन् वडिलांनी केलं दुसरं लग्न; अनावर झाला होता अभिनेत्याचा राग....

23 वर्षांचा तरूण मुलगा अन् वडिलांनी केलं दुसरं लग्न; अनावर झाला होता अभिनेत्याचा राग....

googlenewsNext

बॉलिवूडमधील प्रसिद्ध देओल कुटुंबात सध्या लग्नाचा माहोल  आहे. सनी देओल यांचा मुलगा करण देओल जूनमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. करण त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठ बांधणार आहे.  दुसरीकडे, अशी ही चर्चा आहे की या लग्नाला हेमा मालिनी यांचं कुटुंबही उपस्थित राहणार आहे. देओल कुटुंबात मागील अनेक वर्षात दोन भाग पडले आहेत. आपल्या मुलाच्या लग्नात सनी देओल हे सावत्र आई हेमा मालिनी यांना बोलावणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सनी देओल हे आपली आई प्रकाश कौर यांच्या फार जवळ आहेत. याच कारणामुळे त्यांनी कधी हेमा मालिनी यांना सावत्र आई म्हणून स्वीकारले नाही. मदर्स डेच्या निमित्ताने ही सनी यांनी आईसोबतचे सुंदर फोटो शेअर केले होते. सनी देओल यांनी देओल कुटुंबाला एकत्र जोडून ठेवलं आहे. वडिलांची जबाबदारीही त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. धर्मेंद्र यांनी 2 लग्न केली. पहिली बायको प्रकाश कौर. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांना सनी देओल व्यक्तिरिक्त अजिता, विजेता आणि बॉबी देओल अशी तीन मुलं. सनी नेहमीच आपल्या भावंडांच्या आणि आईच्या जवळ असायचे. 1980 मध्ये जेव्हा धर्मेंद्र यांनी ड्रीम गर्ल हेमा मालिनीसोबत लग्न केले तेव्हा सनी देओल 23 वर्षांचे होते. आपली आई असताना वडिलांनी दुसरं लग्न केल्याचं त्याला अजिबात आवडलं नव्हतं.

दुसरं लग्न केल्यानंतरही धर्मेंद्र प्रकार कौर आणि मुलांची जबाबादारी घ्यायला तयार होते. त्यामुळे धर्मेंद्र प्रकाश कौरला घटस्फोट दिला नाही.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी एकत्र काम करताना प्रेमात पडले. पण अडचण अशी होती की धर्मेंद्र यांचे लग्न झाले होते आणि 1954 मध्ये त्यांचे लग्न प्रकाश कौर यांच्याशी झाले. दोघांनीही 1980 मध्ये कोणतीही पर्वा न करता लग्न केले आणि प्रकाश कौरसाठी तो सर्वात दुःखद दिवस होता. धर्मेंद्र यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांपासून पळून जायचे नव्हते. दुसरं लग्न केल्यानंतरही धर्मेंद्र प्रकार कौर आणि मुलांची जबाबादारी घ्यायला तयार होते. त्यामुळे धर्मेंद्र प्रकाश कौरला घटस्फोट दिला नाही.

 धर्मेंद्रच्या या निर्णयाला हेमा मालिनी यांनी देखील कधी विरोध केला नाही. कारण धर्मेंद्र यांच्यावर त्यांचं प्रेम होतं. त्यांच्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या. वडिलांनी अशा प्रकारे कोणालाही न सांगता केलेलं दुसरं लग्न सनी यांना अजिबात आवडलं नव्हतं. सनी देओल हे धर्मेंद्र हेमा मालिनी यांचा फार राग, द्वेष करायचे.

हेमा मालिनी आमचं घर तोडणार अशी भिती तेव्हा सनी देओल यांना वाटत होती. त्यामुळे सनी नेहमी आईच्या पाठिशी उभे राहिले आणि वडिलांच्या निर्णयाचा त्यांनी पुढे जाऊन सन्मान केला. एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, माझा एकदा अपघात झाला होता तेव्हा सनी सर्वात आधी माझ्यासाठी धावून आला होता.

Web Title: Sunny deol was 23 years old when dharmendra got married to hema malini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.