विवाहित असूनही 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता सनी देओल, अभिनेत्याच्या आईला कळलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 13:32 IST2023-10-19T13:30:59+5:302023-10-19T13:32:56+5:30
दमदार अभिनयाने बॉलिवूड गाजवणाऱ्या सनी देओलचा आज वाढदिवस आहे. सनी देओल बॉलिवूडमधील करिअरबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होता.

विवाहित असूनही 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता सनी देओल, अभिनेत्याच्या आईला कळलं अन्...
'गदर', 'घायल', 'हिंमत', 'अंगरक्षक', 'योद्धा' अशा सुपरहिट चित्रपटांतून अभिनय करुन सनी देओलने ८०-९०चं दशक गाजवलं. तेव्हाच्या काळात बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी सनी देओल एक होता. अनेक तरुणींच्या गळ्यातील तो ताईत बनला होता. 'तारीख पे तारीख', 'ढाई किलो का हात' हे त्याच्या चित्रपटातील डायलॉग आजही लोकप्रिय आहेत. दमदार अभिनयाने बॉलिवूड गाजवणाऱ्या सनी देओलचा आज वाढदिवस आहे.
सनी देओल बॉलिवूडमधील करिअरबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होता. १९८३ साली प्रदर्शित झालेल्या 'बेताब' चित्रपटामुळे सनी देओलचं नाव अमृता सिंहबरोबर जोडलं गेलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सनी आणि अमृतामधील जवळीक वाढली होती. या चित्रपटात त्यांनी किसींग सीन दिला होता. त्याचीही बरीच चर्चा रंगली होती. सनी आणि अमृता रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याचदरम्यान सनी देओलचं लग्न झाल्याचंही समोर आलं होतं.
अमृता सिंग आणि सनी देओल यांच्या रिलेशनशिपला दोन्ही कुटुंबीयांकडून मान्यता नव्हती. सनी देओलची आई प्रकाश कौर यांनी अमृता सून म्हणून पसंत नव्हती. तर अमृता सिंगच्या आईला त्यांच्या घराण्याला शोभेल असा तोडीस तोड श्रीमंत जावई हवा होता. 'बेताब'च्या चित्रिकरणादरम्यान सनी देओल वारंवार इंग्लंडला जात असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी सनी देओल आणि पूजा यांच्या सिक्रेट वेडिंगचे फोटोही व्हायरल झाले होते. लग्न झाल्याची बातमी सनी देओल आणि त्याच्या कुटुंबीयांनी लपवून ठेवली होती. सनीचं करिअर नुकतंच सुरू झाल्यामुळे त्यावर परिणाम होऊ नये, यासाठी लग्नाची माहिती कोणालाच दिली नव्हती.
सनी देओल आणि पूजा यांच्या लग्नाचे फोटो पाहिल्यानंतर अमृता सिंगला मोठा धक्का बसला होता. सनी देओल पूजाला लंडनला भेटण्यासाठी जात होता, ही गोष्ट अमृताच्या लक्षात आली होती. त्यानंतर तिने देओल कुटुंबीयांशी दूर राहणचं पसंत केलं. त्यानंतर एका मुलाखतीत सनी देओलबरोबर रिलेशनशिपच्या अफवा या बेताबसाठी चालवेला पब्लिसिटी स्टंट असल्याचं अमृता सिंग म्हणाली होती.