सनी-अलोकनाथचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 08:01 IST2016-02-24T15:01:27+5:302016-02-24T08:01:27+5:30

बॉलिवूडची बेबी डॉल, विनोदवीर दीपक डेब्रियाल आणि बॉलिवूडचे बाबूजी आलोकनाथ यांचा एक व्हिडीओ सध्या डिजीटल प्लेटफार्मवर चांगलाच गाजत आहे.

Sunny-Aloknath's Video Viral | सनी-अलोकनाथचा व्हिडीओ व्हायरल

सनी-अलोकनाथचा व्हिडीओ व्हायरल

ong>बॉलिवूडची बेबी डॉल, विनोदवीर दीपक डेब्रियाल आणि बॉलिवूडचे बाबूजी आलोकनाथ यांचा एक व्हिडीओ सध्या डिजीटल प्लेटफार्मवर चांगलाच गाजत आहे.

धुम्रपान विरोधी मोहिमेची जाहिरात करण्यासाठी हे तिन्ही स्टार एकत्र आले असून सनी, दीपक व अलोकनाथ यांनी आपल्या भूमिकांची चौकट कायम राखून धुम्रपान करू नये असा संदेश दिला आहे. 



हरयाणी पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या व्हिडीओत बाबूजी मृत्यूशैय्येवर असलेला मुलगा दीपूची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी सनीला सून म्हणून घरात आणतो असे यात दाखविले आहे. मात्र, अती धुम्रपान क रणारा दीपू आपली पहिली रात्रही साजरी करू शकत नाही. एका वेळी केलेल्या धुम्रपानामुळे मृत्यू अधिक जवळ येत जातो हे यात दाखविण्यात आले आहे. चार मिनिटांचा हा व्हिडीओ जेवढा विनोदी आहे तेवढाच मार्मिक संदेश देणारा आहे.



जाहिरातीच्या प्रदर्शनाच्या वेळी सनीने धुम्रपान करू नये असा संदेशही दिला आहे. हा व्हिडीओ देशभरात राबविल्या जाणा-या धुम्रपान विरोधी मोहिमेचा एक भाग असेल. कलावंतानी धुम्रपान विरोधी मोहिमेत सहभाग घ्यावा यासाठी सरकारकडून मागील काही वर्षांत पावले उचलण्यात येत आहेत. शिवाय धुम्रपान किंवा सिगरेटच्या जाहिरातींवर बंदी आणण्यात आली आहे. यूट्युबवर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे हे विशेष. 

Web Title: Sunny-Aloknath's Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.