१३० किलो वजन असलेल्या सुनैनाला लोक म्हणायचे, ‘खरंच तू हृतिक रोशनची बहीण आहेस काय?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 21:46 IST2017-09-21T16:16:33+5:302017-09-21T21:46:43+5:30

सुनैना रोशनने आपबिती सांगताना म्हटले की, लोक मला तू खरंच हृतिकची बहीण आहेस काय? असे टोमणे मारायचे, वाचा सविस्तर!

Sunna, who weighed 130 kg, people would say, 'Are you really Hrithik Roshan's sister?' | १३० किलो वजन असलेल्या सुनैनाला लोक म्हणायचे, ‘खरंच तू हृतिक रोशनची बहीण आहेस काय?’

१३० किलो वजन असलेल्या सुनैनाला लोक म्हणायचे, ‘खरंच तू हृतिक रोशनची बहीण आहेस काय?’

यांचे वजन अधिक असते, अशांना नेहमीच लोकांचे टोमणे ऐकावे लागतात. ‘किती खातोस? जमनीवरचा बोझ आहेस, आता तरी उपकार कर, एखाद्या दिवशी फुटून जाशील’ अशाप्रकारचे टोमणे स्थूल लोकांना नेहमीच सुनावले जातात. प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन याची बहीण सुनैना रोशन हिलादेखील अशाच काही टोमण्यांचा सामना करावा लागला. कारण तिला बघून बहुतांश लोक म्हणायचे की, ‘तू खरंच हृतिकची बहीण आहेस काय? अजिबातच वाटत नाही.’

नुकतेच सुनैनाने तिचे तब्बल ६० किलो वजन कमी केल्याने ती चर्चेत आली. सुनैनाचे अगोदर १३० किलो वजन होते. परंतु अथक मेहनत घेत तिने वजन घटविले आहे. यासाठी तिला तब्बल दोन वर्षे जिममध्ये घाम गाळावा लागला. शिवाय फॅट कमी करण्यासाठी तिला सर्जरीचाही आधार घ्यावा लागला. दरम्यान, या सर्व उपचाराअगोदर ती दररोज तीन किलो मिठाई खात होती. ज्यामध्ये दोन किलो रसमलाई असायची. 
 

आतादेखील सुनैनाचे खाण्याकडे मन वळते. अशात ती चॉकलेट आणि केक खाऊन मिठाई खाण्याची हौस भागविते. सुनैनाने केलेल्या वेट लॉसमुळे भाऊ हृतिकही खूप प्रभावित झाला आहे. त्याने सुनैनाचे तोंडभरून कौतुक केले आहे. हृतिकनेच त्याच्या ट्विटर अकाउंटवर सुनैनाचा वजन कमी केल्याचा आणि वजन वाढलेले असल्याचा फोटो शेअर केला होता. या दोन्ही फोटोंमध्ये सुनैनाच्या फिगरमध्ये कमालीचा फरक दिसत होता. 

एका वेबसाइटशी बोलताना सुनैनाने म्हटले होते की, सुरुवातीला मला लोक म्हणायचे, आम्हाला विश्वासच बसत नाही की तू हृतिकची बहीण आहेस. कारण तू ऐवढी फॅट आणि तो ऐवढा फिट असा फरक कसा असू शकतो. खरं तर जेव्हा मी वजन कमी करण्याचा विचार केला तेव्हा मला हे शक्य होईल असे वाटत नव्हते. परंतु भाऊ हृतिकच्या सपोर्टमुळे आणि जिम प्रॅक्टिसमुळे हे शक्य झाले. अर्थात सर्जरीचाही फायदा झाल्याचे तिने सांगितले. 

Web Title: Sunna, who weighed 130 kg, people would say, 'Are you really Hrithik Roshan's sister?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.