३० वर्षे लहान मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चेवर संतापली सुनीता अहुजा, म्हणाली - "त्यांना शुगर डॅडी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 18:27 IST2025-09-30T18:25:14+5:302025-09-30T18:27:45+5:30
Govinda And Sunita Ahuja: बॉलिवूडचा 'हिरो नंबर १' गोविंदा पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता, ज्याला या जोडप्याने निराधार ठरवले.

३० वर्षे लहान मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चेवर संतापली सुनीता अहुजा, म्हणाली - "त्यांना शुगर डॅडी..."
बॉलिवूडचा 'हिरो नंबर १' गोविंदा (Govinda) पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा (Sunita Ahuja) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता, ज्याला या जोडप्याने निराधार ठरवले. त्यावेळी गोविंदाचे अफेअर एका मराठी अभिनेत्रीसोबत सुरू असल्याच्या अफवा होत्या. आता यावर गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाने भाष्य केले आहे. सुनीता म्हणाली की, जो माणूस एका चांगल्या स्त्रीला दुःख देईल, तो कधीच सुखी राहणार नाही.
सुनीता अहुजाने अलीकडेच तिचे यूट्यूब अकाउंट सुरू केले आहे आणि आता तिच्या लेटेस्ट व्लॉगमध्ये तिने संभावना सेठसोबत बोलताना पतीच्या अफेअरच्या चर्चांवर थेट भाष्य केले आहे. ती म्हणाली की, ''ज्या दिवशी तिला पतीच्या अफेअरबद्दल कळेल, त्या दिवशी सर्वात आधी ती स्वतः माध्यमांसमोर येऊन बोलेल. सुनीताने तिच्या कुटुंबातील काही लोकांबाबत नाराजी व्यक्त केली.'' ती म्हणाली की, ''मूळ गोष्ट अशी आहे की गोविंदाच्या कुटुंबातील काही लोकांना मी त्याच्यासोबत असलेले आवडत नाही. त्याच्या कुटुंबात इतका आनंद का आहे, याचा त्यांना त्रास होतोय. कारण त्यांची स्वतःची बायका-मुले तर मेली आहेत.''
'मुलींना 'शुगर डॅडी'ची सवय लागलीय...
गोविंदांच्या पत्नीने पुढे म्हटले, ''गोविंदाचे सर्कल ठीक नाहीये, तो चमच्यांसोबत राहतो. तुम्ही ज्या लोकांसोबत राहता, तसेच बनता. मागच्या १५ वर्षांपासून मी आणि चिची (गोविंदा) बिल्डिंगमध्ये समोरासमोर राहतोय. तो घरी येतो-जातो. ज्या दिवशी मला असा काही पुरावा मिळेल, मी स्वतः मीडियामध्ये जाऊन हे बोलेन, कारण जी व्यक्ती चांगल्या स्त्रीला दुःख देईल, ती कधीच सुखी राहणार नाही.''
''मुलींना 'शुगर डॅडी'ची सवय झालीय...''
सुनीताने पुढे आपल्या भावना व्यक्त केल्या, ''मी लहानपणापासून ५५ वर्षांपर्यंतचे आयुष्य गोविंदाला दिले आहे. मी नाराज आहे, पण मला फरक पडत नाही, कारण माझ्यासोबत माझी मुलं आहेत. चित्रपटसृष्टीत नवीन मुलींना 'शुगर डॅडी'ची सवय झाली आहे. ज्या दिवशी मी पकडेन, तेव्हा खूप मारणार. माझ्या या ५ किलोच्या सनी देओलच्या हाताने यात तेव्हा माता राणीची शक्ती येईल.''