सुनील ग्रोव्हर घेतोय ‘डॉन’चा इंटरव्हू!; ‘कॉफी विद डी’चा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 16:14 IST2016-12-17T16:09:54+5:302016-12-17T16:14:44+5:30
coffee with d trailer sunil grover playing arnab; सुनील ग्रोव्हरचा आगामी चित्रपट ‘कॉफी विद डी’चा ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटात सुनील हा अर्र्णब नावाच्या पत्रकाराची भूमिका साकारत असून, तो दाऊदचा इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करताना दिसेल.
.jpg)
सुनील ग्रोव्हर घेतोय ‘डॉन’चा इंटरव्हू!; ‘कॉफी विद डी’चा ट्रेलर रिलीज
कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये डॉक्टर मशहूर गुलाटी ही कॉमिक भूमिका सुनील ग्रोव्हर साकारताना दिसतो. यासोबतच त्याने अनेक चित्रपटात कॉमिक भूमिका केल्या आहेत. या चित्रपटात अभिनेता जाकीर हुसैन हा दाऊद ही भूमिका साकारणार आहे. तर सुनील ग्रोव्हर पत्रकार अर्णबच्या भूमिकेत दिसेल. सुनील ग्रोव्हर आपल्या भूमिके बद्दल म्हणाला, अर्णब गोस्वामी अतिशय मनोरंजक पत्रकार आहेत, मात्र मी या चित्रपटात त्यांची नक्कल करताना दिसणार नाही. दिग्दर्शकाने या चित्रपटात माझ्या भूमिकेचे नाव अर्णब असावे असा निर्णय घेतला मात्र हे एक फिक्शनल कॅरेक्टर (काल्पनिक पात्र) आहे.
अभिनेता जाकिर हुसैन याला दाऊदच्या कॅरेक्टरची तयारी कशी केली असा प्रश्न विचारण्यात आला? यावर जाकीर म्हणाला, मी या भूमिकेसाठी रिसर्च केला. आतापर्यंत त्याच्यावर आलेल्या सर्व बातम्या पाहिल्या, त्याच्या बोलण्याची पद्धत आणि अन्य लहान लहान गोष्टींचा अभ्यास केला.
सुनील ग्रोव्हर व जाकीर हुसैन यांची भूमिका असलेला कॉफी विद डी हा कॉमेडी चित्रपट असून, यात अर्णब नावाचा पत्रकार आपल्या बंद होणाºया चॅनलसाठी दाऊदचा इंटरव्ह्यू करण्याचा प्रयत्न करतो, असे दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट ६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.