‘सुलतान’च्या ओपनिंगचा आमीरला घ्यायचाय फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 16:00 IST2016-07-05T10:30:57+5:302016-07-05T16:00:57+5:30

सलमान खानच्या ‘सुलतान’ चित्रपटाचे दणक्यात ओपनिंग होणार हे लक्षात घेऊन, आपल्या ‘दंगल’ चित्रपटासाठी त्याचा फायदा कसा घ्यायचा याचे गणित ...

'Sultan's opening' is beneficial to Aamir Khan! | ‘सुलतान’च्या ओपनिंगचा आमीरला घ्यायचाय फायदा!

‘सुलतान’च्या ओपनिंगचा आमीरला घ्यायचाय फायदा!

मान खानच्या ‘सुलतान’ चित्रपटाचे दणक्यात ओपनिंग होणार हे लक्षात घेऊन, आपल्या ‘दंगल’ चित्रपटासाठी त्याचा फायदा कसा घ्यायचा याचे गणित आमीर खान मांडतो आहे.
‘सुलतान हा सुपर डुपर हिट होणार आहे. जे लाखो लोक सुलतान पाहतील, त्यांनी दंगलचे पोस्टर पाहावे अशी माझी इच्छा आहे. आम्ही लोकांना सांगू इच्छितो आमचा चित्रपट येत्या काही महिन्यात येतो आहे. सुलतानला बंपर ओपनिंग मिळण्याची शक्यता आहे. सुलतानच्या या यशाचा आम्ही लाभ उठवू इच्छितो,’ असे आमीरने सांगितले.
यापूर्वी सलमान आणि आमीरने ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. आता दोघांच्याही चित्रपटात ते पहिलवानाची भूमिका करीत आहेत.
या दोन्ही चित्रपटात कोणतेही साम्य नाही. यामध्ये केवळ कुस्ती हाच विषय समान आहे. असे अनेक चित्रपट असतात ज्यात बदला घेतला जातो, अनेक रोमँटिक चित्रपट असतात, परंतू आमच्या दोघांच्याही चित्रपटाची कथा वेगळी आहे, असे आमीर म्हणताला.
आमीरने सुलतानच्या ट्रेलरचे आणि सलमानच्या लुकचे कौतुक केले. अली अब्बास जफर यांनी ज्या पद्धतीने हा चित्रपट केला आहे, तो अत्यंत सुंदर आहे. खरोखरच एक्सायटिंग आहे. याला प्रचंड यश मिळेल आणि सर्व विक्रम मोडेल, अशी अपेक्षा असल्याचे आमीरने सांगितले.

Web Title: 'Sultan's opening' is beneficial to Aamir Khan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.