‘सुल्तान’चे सर्वाधिक ‘दिवाने’ ; गुगल ट्रेंडवर ‘कबाली’ दुसऱ्या क्रमांकावर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 12:50 IST2016-12-15T12:50:46+5:302016-12-15T12:50:46+5:30

सुपरस्टार सलमान खान याने ‘सुल्तान’ चित्रपटात केलेल्या अभिनयाचे कौतुक केवळ चाहत्यांनीच नव्हे तर ‘बी टाऊन’ च्या तारे-तारकांनीही के ले. ...

'Sultan's Most Wanted'; 'Kabbali' second place on Google Trends. | ‘सुल्तान’चे सर्वाधिक ‘दिवाने’ ; गुगल ट्रेंडवर ‘कबाली’ दुसऱ्या क्रमांकावर..

‘सुल्तान’चे सर्वाधिक ‘दिवाने’ ; गुगल ट्रेंडवर ‘कबाली’ दुसऱ्या क्रमांकावर..

परस्टार सलमान खान याने ‘सुल्तान’ चित्रपटात केलेल्या अभिनयाचे कौतुक केवळ चाहत्यांनीच नव्हे तर ‘बी टाऊन’ च्या तारे-तारकांनीही के ले. त्यामुळे ‘टॉप ट्रेडिंग मुव्ही’च्या यादीत ‘सुल्तान’ अव्वल ठरला आहे. विशेष म्हणजे, मेगास्टार रजनीकांत यांच्या  ‘कबाली’ला पिछाडीवर टाकत  ‘सुल्तान’ने या यादीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. 

                             

बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच  ‘टॉप ट्रेडिंग बॉलिवूड स्टार्स’च्या यादीमध्ये सुशांत सिंग राजपूत, सलमान खान, रणवीर सिंग यांनी स्थान पटकावले. तर दिशा पटानी, उर्वशी रौतेला, वाणी कपूर, पूजा हेगडे या सर्वाधिक सर्च केलेल्या अभिनेत्री ठरल्या.



गुगल इंडियातर्फे २०१६ मधील ट्रेंडिग चित्रपटांची यादी नुकतीच जाहिर करण्यात आली. या यादीमध्ये ‘सुल्तान’ सरस ठरला. पहिल्या पाच चित्रपटांत शाहिद कपूरचा ‘उडता पंजाब’, अक्षय कुमारचा ‘एअरलिफ्ट’ आणि रणबीर कपूर -अनुष्का शर्माचा वादग्रस्त चित्रपट ‘ऐ दिल हैं मुश्किल’ या चित्रपटांनी स्थान पटाकवले.



बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या एकाही चित्रपटाला या यादीत स्थान मिळू शकले नाही. यंदाच्या वर्षी किंग खानचे ‘फॅन’ आणि ‘डिअर जिंदगी’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. पण, या दोन्ही ‘टॉप ट्रेडिंग मुव्ही’च्या यादीत स्थान मिळवता आलेले नाही.

 ‘सुल्तान’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. या चित्रपटात सलमान खान आणि अनुष्का शर्मा यांनी मुख्य भूमिका साकारली होती. सुल्तानचा कष्टदायी प्रवास यात मांडण्यात आला होता.  

Web Title: 'Sultan's Most Wanted'; 'Kabbali' second place on Google Trends.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.