सुलतान झाला लीक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2016 11:42 IST2016-07-06T06:12:09+5:302016-07-06T11:42:09+5:30
उडता पंजाब, ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटांनंतर आता सुलतान हा चित्रपट ऑनलाईन लीक झालेला आहे. सुलतान ईदच्या निमित्ताने प्रदर्शित ...
.jpg)
सुलतान झाला लीक
उ ता पंजाब, ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटांनंतर आता सुलतान हा चित्रपट ऑनलाईन लीक झालेला आहे. सुलतान ईदच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आला. पण प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच तो ऑनलाईन लीक झाला आहे. हा चित्रपट डार्कनेटवर उपलब्ध असून अद्याप तरी हा टोरेंटवर आलेला नाही. तो टोरेंटवर उपलब्ध होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे अनेक वेबसाईट मंगळवार संध्याकाळपासून ब्लॉक करण्यात आल्या आहेत आणि लींक अपलोड केल्यानंतर लगेचच त्या काढूनही टाकण्यात आलेल्या आहेत. सुलतान हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात दीडशे कोटींचा गल्ला जमवेल आणि तीनशे करोड तरी कमवेल असा अंदाज वर्तवला जात होता. पण आता लीक झाल्याचा चित्रपटाला फटका बसेल असे म्हटले जात आहे.