सुहानाच्या ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष; किंमत ऐकून तुम्हीही चक्रावून जाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 17:28 IST2020-01-05T17:28:11+5:302020-01-05T17:28:46+5:30

शाहरुखने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये सुहानाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत होती.

 Suhana's dress attracted everyone's attention; You will be shocked to hear the price! | सुहानाच्या ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष; किंमत ऐकून तुम्हीही चक्रावून जाल!

सुहानाच्या ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष; किंमत ऐकून तुम्हीही चक्रावून जाल!

किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झालीय. मध्यंतरी तिने तिच्या वेगवेगळया हॉट फोटोंनी तिचे सोशल मीडिया अकाऊंट अपडेट झाले होते. चाहत्यांनीही तिला तिच्या हॉट अंदाजावरून ट्रोल के ले आहे. आता पुन्हा ती चर्चेत आलीय. ते म्हणजे तिच्या एका हटके नव्या ड्रेसमुळे आणि त्याच्या किंमतीमुळे. आता तुम्ही म्हणाल असे काय विशेष होते या ड्रेसमध्ये? तर होय आम्ही तुम्हाला सांगतोय.

नुकतेच सुहाना संपूर्ण कुटुंबीयांसोबत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अमेरिकेहून भारतात परतली. दरम्यान शाहरुखने पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे सुहानाने परिधान केलेल्या ड्रेसने. शाहरुखने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये सुहानाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत होती. तिने परिधान केलेल्या या ड्रेसमुळे ती सध्या चर्चेत आहे. या ड्रेसची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. सुहानाने परिधान केलेल्या बालमेन ड्रेसची किंमत दोन लाख रुपये आहे.

शाहरुखने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना आमंत्रण देण्यात आले होते. सुहानाची खास मैत्रीण अनन्या पांडे आणि संजय कपूर तेथे उपस्थित असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. गौरी खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊं टवर पार्टीमधील फोटो शेअर केले आहेत.

Web Title:  Suhana's dress attracted everyone's attention; You will be shocked to hear the price!