सुहाना खानच्या 'द आर्चीज' सिनेमाचा ट्रेलर 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 07:32 PM2023-11-08T19:32:10+5:302023-11-08T20:04:51+5:30

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानच्या 'द आर्चीज' सिनेमाचा ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Suhana Khan's 'The Archies' trailer will be released tomorrow | सुहाना खानच्या 'द आर्चीज' सिनेमाचा ट्रेलर 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सुहाना खानच्या 'द आर्चीज' सिनेमाचा ट्रेलर 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान सध्या चर्चेत आहे. लवकरच ती जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या सिनेमात दिसणार आहे. सुहाना खान या सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. आता उद्या या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज संदर्भात एक मोठे अपडेट आले आहे.

 'द आर्चीज'च्या निर्मात्यांनी ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली आहे आणि नवीन पोस्टर देखील रिलीज केले आहे. सुहाना खान आणि खुशी कपूरच्या या डेब्यू चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

'द आर्चीज' हा सिनेमा अमेरिकन लोकप्रिय कॉमिक्स 'द आर्चीज'वर आधारित असून 1960 च्या काळावर भाष्य करणारा आहे.  मैत्री,फ्रिडम, प्रेम आणि हार्ट ब्रेक हे सर्व 'द आर्चीज' या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.  सुहाना खान वेरोनिकाच्या भूमिकेत आहे. खुशी कपूर बेट्टीच्या तर अगस्त्य नंदा आर्चिजच्या टायटल रोलमध्ये दिसणार आहे. तर वेदांग रैना, मिहिर आहूजा, डॉट आणि युवराज मेंडा हे नवोदित कलाकारदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

Web Title: Suhana Khan's 'The Archies' trailer will be released tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.