Suhana Khan च्या The Archies ची शूटिंग सुरू, लीक झाला सेटवरचा जबरदस्त लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 13:05 IST2022-03-25T13:02:48+5:302022-03-25T13:05:26+5:30
बऱ्याच दिवसांपासून तिच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा होती आणि आता अखेर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

Suhana Khan च्या The Archies ची शूटिंग सुरू, लीक झाला सेटवरचा जबरदस्त लूक
बॉलिवूडच्या नेक्स्ट जनरेशन स्टार्स सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा आपल्या डेब्सूसाठी तयार आहेत. ही सर्व स्टार किड्स दिग्दर्शिका झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या सिनेमात दिसणार आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा होती आणि आता अखेर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
लीक झालेले स्टार किड्सच्या फोटोत सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा 'द आर्चीज'च्या सेटवर दिसले होते. सोशल मीडियावर आता प्रत्येकाचे लूक लीक झाले आहेत. ब्राउन रंगाच्या केसांमध्ये खुशी कपूर एका नव्या लूकमध्ये दिसते आहे. ब्राउन रंगाच्या आउटफिटमध्ये अगस्त्य दिसतो आहे. तर सुहाना खान काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. लीक झालेले फोटो चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
झोया अख्तरच्या या चित्रपटात संजय कपूरचा मुलगा जहान कपूरही दिसणार आहे. जहानचाही हा पहिलाच चित्रपट आहे. 'द आर्चीज' हा चित्रपट आर्चीज कॉमिक्सवर आधारित आहे. यामध्ये सुहाना खान वेरोनिका लॉजची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचबरोबर अगस्त्य, आर्ची एंड्रयूज आणि खुशी कपूर बेटी कूपरच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात जहान जगहेड जोन्सची भूमिका साकारताना दिसणार आहे.
सोशल मीडियावर लीक झालेल्या फोटोंमध्ये सुहाना खानसोबत खुशी कपूर, अगस्त्य नंदा, नव्या नवेली नंदा, गौरी खान, झोया अख्तर, जहान कपूर देखील दिसत आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.द आर्चीज हा एक म्युझिकल ड्रामा असेल, जो 60 च्या दशकात बेतलेला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर येणार आहे.