स्टार्सचे असेही प्राणीप्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:23 IST2016-01-16T01:18:52+5:302016-02-07T05:23:04+5:30

माझे मांजर डोसाला मी कधीच विसरू शकत नाही. कामानिमित्त मला बर्‍याच ठिकाणी फिरावे लागते. माझ्या मित्राच्या घरी डोसाला सोडून ...

Such love of stars is love | स्टार्सचे असेही प्राणीप्रेम

स्टार्सचे असेही प्राणीप्रेम

झे मांजर डोसाला मी कधीच विसरू शकत नाही. कामानिमित्त मला बर्‍याच ठिकाणी फिरावे लागते. माझ्या मित्राच्या घरी डोसाला सोडून जाते आणि त्याला ते आवडत नाही. मी जेव्हा परत येते, त्यावेळी तो सारा राग माझ्यावर काढते. काही वेळा तर मी येईपर्यंत दोन दोन दिवस जेवतदेखील नाही. ज्ॉक्लिन फर्नांडिस सांगते, माझ्या घरामधील सात कुत्री, दोन मांजर, कासव, मासे, चार ससे आणि त्याचप्रमाणे अनेक पाळीव प्राण्यांसोबत मी लहानाची मोठी झाले. मला आपल्या डॉल हाऊसमध्ये बेबी माऊस ठेवणे आवडत होते, मात्र माझी आई रागवायची. सध्या मुंबईतील घरात छोटेसे पिल्लू आहे. तिचे नाव मिऊमिऊ आहे. पाळीव प्राणी हे आपणास बरेच काही शिकवितात.
सिद्धार्थ मल्होत्रा
कोणताही पाळीव प्राणी स्वत:पेक्षा तुमच्यावर अधिक प्रेम करतो. माझा पेट बॉक्सर हा माझ्या कुटुंबाप्रमाणे आहे. पाळीव प्राण्यांची काळजी घेणे हे आवश्यक आहे. अशा प्राण्यांची काळजी घेणे हीच खरी मानवता आहे.
वीर दास
माझ्या घरी असणारा कुत्रा हा नेहमीच मला हसवतो. मी माझं आयुष्य इतरांना हसविण्यात खर्च केले आहे, मात्र माझा कुत्रा हा माझ्यापेक्षा गमतीदार असल्याचं मला वाटतं. माझ्या आयुष्यातील सर्वात मजेदार भाग माझा कुत्रा आहे.
सनी लिऑन
माझे पती डॅनिअल वेबर आणि मी आम्ही दोन कुत्रे पाळले आहेत. चॉपर आणि लिऊ. ते संमिश्र प्रजातीचे आहेत. ते किती वर्षाचे आहेत, मला माहिती नाही. मी इतकंच सांगू इच्छिते की, मी त्यांच्यावर खूप प्रेम करते. माझ्या आयुष्यातील आनंदाचे क्षण त्यांच्यामुळे आले आहेत.
सुनील शेट्टी
मी जन्मल्यापासून प्राण्यांच्या प्रेमात आहे. मी सिंह राशीचा आहे. म्हणजे जन्मापासूनच मी सिंह आहे. कुत्री, कोंबडे आणि इतर अनेक पाळीव प्राणी माझ्या मंगळूरमधील फार्महाऊसवर आहेत. माझ्या घरी पाच कुत्री आहेत. ट्रॉय, टॉम, ड्यूक, पग चेलेसा आणि ब्रॉडी अशी त्यांची नावे आहेत. यापैकी मी तीन गमावली आहेत. माझ्या कुटुंबातील मना, आथिया आणि अहान यांना हे प्राणी आवडतात. आम्ही प्राण्यांविषयी नेहमीच बोलत असतो.
अर्जुन रामपाल
प्राणी तुमच्यावर अगणित प्रेम करतात. जेव्हा तुम्ही कामानिमित्त बाहेर जाता अगदी पाच दिवस अथवा महिन्यानंतर तुम्ही परत येता, त्यावेळी अगदी तुमच्या अंगावर उडी घेऊन तुमच्याविषयी आपले प्रेम दर्शवितात. माझा डॉगीही असाच आहे.
सूरज पांचोली
मी नेहमीच प्राण्यांच्या प्रेमात आहे. आमच्याकडे सर्व प्रकारचे प्राणी आहेत. कोंबड्या, उंदीर, ससे, पक्षी, कासव सारं काही आहे. माझा बंगला म्हणजे एक प्रकारचे प्राणीसंग्रहालयच आहे. माझ्याकडे १४ कुत्रे आहेत, मी प्रत्येकाशी जोडला गेलो आहे. जेव्हा हे कुत्रे आजारी पडतात अथवा त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज असते त्यावेळी अशा सर्जनना शोधण्यात खूप वेळ जातो. बॉलिवूडचे कलाकार काय करतात, कसे राहतात, कसे वागतात याची उत्सुकता सार्‍यांनाच लागलेली असते. आपल्या आवडत्या कलाकारांची नक्कल करणे बर्‍याच जणांना आवडते. अत्यंत व्यस्त अशा दिवसभराच्या कार्यक्रमानंतर अनेक कलाकार आपल्या घरातील प्राण्यांसोबत वेळ घालवितात. अशाच काही कलाकारांच्या प्राणीप्रेमाविषयी व ते प्राण्यांबद्दल कसा विचार करतात ते आज आपण जाणून घेणार आहोत. 

Web Title: Such love of stars is love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.