पत्रलेखा अन् राजकुमार राव या ‘लव्हबर्ड्स’मध्ये रंगणार ‘संघर्ष’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 14:09 IST2018-04-06T08:39:28+5:302018-04-06T14:09:28+5:30
बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा या दोघांनी आपले नाते कधीच लपवले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून दोघेही ...

पत्रलेखा अन् राजकुमार राव या ‘लव्हबर्ड्स’मध्ये रंगणार ‘संघर्ष’!!
ब लिवूडचा हरहुन्नरी अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा या दोघांनी आपले नाते कधीच लपवले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. मध्यंतरी राजकुमार व पत्रलेखा लग्नबंधनात अडकणार, अशी बातमीही होती. पण दोघांनीही हे वृत्त खोडून काढले होते. पत्रलेखाने तर आणखी ८ वर्षे तरी आम्ही लग्न करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. सध्या आमचा संपूर्ण फोकस आमच्या कामावर आहे. किमान पुढील आठ वर्षे तरी आम्ही लग्न करू, असे आम्हाला वाटत नाही, असे पत्रलेखा म्हणाली होती. पण आज आम्ही तुम्हाला या जोडप्याच्या लग्नाबद्दल नाही तर त्यांच्या संघर्षाबद्दल सांगणार आहोत. होय, येत्या २० एप्रिलला राजकुमार व पत्रलेखा हे प्रियकर-प्रेयसी आमने- सामने उभे ठाकणार आहेत. आता आम्ही कुठल्या संघर्षाबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. होय, आम्ही बोलतोय ते त्यांच्या बॉक्सआॅफिस संघर्षाबद्दल. राजकुमारचा ‘ओमेर्टा’ हा चित्रपट २० एप्रिलला रिलीज होतोय आणि नेमक्या याच तारखेला पत्रलेखाचा ‘नानू की जानू’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. होय, म्हणजे दोघांचेही सिनेमे बॉक्सआॅफिसवर आमने-सामने येणार आहेत.
ALSO READ : राजकुमारने पत्रलेखासोबतच्या नात्याबाबत केले 'हे' वक्तव्य
प्रियकर-पे्रयसीचा हा ‘संघर्ष’ निश्चितपणे रोचक असणार आहे. काहीजणांना हा ‘संघर्ष’ थोडा खटकू शकतो. पण पत्रलेखा व राजकुमार राव यांचा फंडा मात्र एकदम स्पष्ट आहे. होय, एकमेकांच्या कमर्शिअल लाईफमध्ये ढवळाढवळ न करण्याचा. त्यामुळे या ‘संघर्षाचा त्यांच्या रिलेशनशिपवर तसा कुठलाच परिणाम होणार नाहीये.
‘ओमेर्टा’ या हंसल मेहता दिग्दर्शित चित्रपटात दहशतवादी अहमद उमर सईद शेख याची कथा आहे. सईदने २००२ मध्ये वॉल स्ट्रिट जर्नलचा पत्रकार डेनियल पर्ल याचे पाकिस्तानात अपहरण करून त्याची हत्या केली होती. या आरोपात उमरला फाशीची शिक्षा ठोठावली गेली आहे. पण अद्यापही या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही. तर ‘नानू की जानू‘ या चित्रपटात पत्रलेखासोबत अभय देओल मुख्य भूमिकेत आहे.