‘31st Ocotber’ साठी सोहाने केले ‘स्ट्रिट शॉपिंग’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 19:00 IST2016-08-27T13:30:22+5:302016-08-27T19:00:22+5:30
माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या हत्येवर आधारित ‘31st Ocotber’ या चित्रपटात सोहा अली खान एका मध्यमवर्गीय पंजाबी महिलेच्या ...
.jpg)
‘31st Ocotber’ साठी सोहाने केले ‘स्ट्रिट शॉपिंग’
म जी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या हत्येवर आधारित ‘31st Ocotber’ या चित्रपटात सोहा अली खान एका मध्यमवर्गीय पंजाबी महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. ८० च्या दशकाच्या पार्श्वभूमीवर साकारणाºया या चित्रपटात सोहा दोन मुलांच्या आईची भूमिका साकारणार आहे. भूमिकेत जीव ओतण्यासाठी सोहाने कुठलीच कसर सोडली नाही. अगदी मध्यवर्गीय पंजाबी महिलेची व्यक्तिरेखा अधिक विश्वासार्ह वाटावी यासाठी सोहाने चंदीगडच्या रस्त्यांवरील ठेल्यांवर शॉपिंग केली. चंदीगडच्या सेक्टर १७ व २२ मध्ये सोहाने तिच्या स्टाईलिस्टसोबत अनेक लहान मोठ्या वस्तू खरेदी केल्या. भूमिका पडद्यावर जिवंत करण्यासाठी हे करणे गरजेचे होते. त्यामुळेच मी स्ट्रिट शॉपिंग करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या रस्त्यांवर लहान-सहान वस्तू खरेदी करण्याचा अनुभव माझ्या कायम आठवणीत राहिल, असे सोहा म्हणाली. व्वा सोहा, तुस्सी मान गयें!