​‘मेरी प्यारी बिंदू’ची स्टोरी लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 06:50 IST2016-02-14T13:50:18+5:302016-02-14T06:50:18+5:30

इंटरनेटच्या युगात गुप्त गोष्टी लीक होणे फार कॉमन झाले आहे. अनेक दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटाच्या कथेबाबत खूप गुप्तता बाळगून असतात. ...

Story Story of 'My Sweet Bindu' | ​‘मेरी प्यारी बिंदू’ची स्टोरी लीक

​‘मेरी प्यारी बिंदू’ची स्टोरी लीक

टरनेटच्या युगात गुप्त गोष्टी लीक होणे फार कॉमन झाले आहे. अनेक दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटाच्या कथेबाबत खूप गुप्तता बाळगून असतात.

तशीच गुप्तता ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाबाबतही पाळण्यात येत होती; मात्र खुद्द परिणीती चोपडाने चित्रपटाची स्टोरीलाईन ओपन केली.

तिने सांगितले की, ‘मेरी प्यारी बिंदू’ ही हृदयद्रावक प्रेमक हाणी आहे. मी यामध्ये एका उगवत्या गायिकेच्या भूमिकेत असून, मी आयुषमान खुराणाच्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडते. चित्रपटाची बहुतांश शूटिंग कोलकात्यात होणार आहे.’

आयुषमानच्या भूमिकेबद्दल मात्र तिने काहीही सांगण्यास नकार दिला; परंतु तो संगीतकाराच्या भूमिकेत असण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळानंतर परिणीती या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

Web Title: Story Story of 'My Sweet Bindu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.