मार्चमध्ये येणार ‘कहानी’ सिक्वेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2016 22:57 IST2016-02-23T05:57:20+5:302016-02-22T22:57:20+5:30

‘हमारी अधुरी कहानी’ नंतर आता ‘कहानी २’ साठी विद्या बालन सज्ज झाली आहे. तिने नुकताच सुजय घोष यांच्या ‘टीन’ ...

'Story' sequel to come in March ... | मार्चमध्ये येणार ‘कहानी’ सिक्वेल...

मार्चमध्ये येणार ‘कहानी’ सिक्वेल...

मारी अधुरी कहानी’ नंतर आता ‘कहानी २’ साठी विद्या बालन सज्ज झाली आहे. तिने नुकताच सुजय घोष यांच्या ‘टीन’ चित्रपटात महिला पोलिसाची भूमिका केली आहे. नॅशनल अ‍ॅवॉर्ड विनिंग दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी यांचा बंगाली चित्रपट ‘राजकहाणी’ च्या हिंदी भाषांतरित चित्रपटात भूमिका केली आहे.

तसेच वादग्रस्त लेखिका कमला दास हिच्या बायोपिकसाठीही होकार दिलेला आहे. या दोन चित्रपटांअगोदर मात्र २०१२ मध्ये रिलीज झालेल्या ‘कहानी’ थ्रिलरचा सिक्वेल साठी शूटिंग सुरू करणार आहे. 

‘कहानी २’ चे शेड्यूल ९० दिवसांचे कोलकाता येथे असणार आहे, असे निर्माता जयंतीलाल गाडा यांनी जाहीर केले. विद्या म्हणाली,‘ सुजॉय आणि मी मिळून चित्रपट करतोय. ‘कहानी २’ पण तेवढाच उत्तम होणार अशी अपेक्षा आहे. सुजॉयकडे अजून महत्त्वाच्या स्क्रि प्ट्स आहेत.’

कहानी चित्रपट जिथे संपला होता तिथूनच पुढे कहानी सुरू होणार का? यावर गाडा म्हणाले,‘ ते बाकीची माहिती सुजॉयच देऊ शकेल. आम्ही केवळ मार्च २०१७ मध्ये चित्रपट रिलीज करण्याच्या विचारात आहोत. कोलकाता येथे चित्रपटाची शूटिंग व्हावी आणि कुठलीच कमतरता असू नये, एवढीच अपेक्षा आहे.’ 

Web Title: 'Story' sequel to come in March ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.