शाहरूख-सलमानच्या ‘दोस्ती अन् दुश्मनी’ची पडद्यामागची कथा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 16:54 IST2016-12-02T16:53:09+5:302016-12-02T16:54:13+5:30

बॉलिवूडचा ‘किंगखान’ शाहरूख खान आणि ‘दबंग खान’ सलमान खान या दोघांना आॅनस्क्रीन एकत्र पाहण्याचा योग लवकरच येतोय. हे दोघेही ...

The story behind Shahrukh-Salman's 'friendship and animosity' story ...! | शाहरूख-सलमानच्या ‘दोस्ती अन् दुश्मनी’ची पडद्यामागची कथा...!

शाहरूख-सलमानच्या ‘दोस्ती अन् दुश्मनी’ची पडद्यामागची कथा...!

बॉलिवूडचा ‘किंगखान’ शाहरूख खान आणि ‘दबंग खान’ सलमान खान या दोघांना आॅनस्क्रीन एकत्र पाहण्याचा योग लवकरच येतोय. हे दोघेही ‘खान’अनेक वर्षांनंतर झाले गेले विसरून लवकरच  स्क्रीन अवार्ड शो एकत्र होस्ट करताना आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ही न्यूज ट्रेंडिंगमध्ये आहे. एकेकाळी बॉलिवूडच्या या ‘करण-अर्जुन’मध्ये चांगलीच दोस्ती होती. पण यानंतर दोघांमध्येही असे काही बिनसले की, अख्खे बॉलिवूड  दोन ‘खानांमध्ये’ विभागले गेले. त्याकाळात एकमेकांचे नाव ऐकणेही हे दोघे पसंत करीत नसत. पण गेल्या वर्षभरापासून बॉलिवूडचे हे दोघे ‘करण-अर्जून’ पुन्हा एकमेकांच्या गळ्यांत गळे घालून मिरवू लागले आहेत. या ‘दोस्ती अन् दुश्मनी’ची पडद्यामागची कथा खास तुमच्यासाठी....


करण-अर्जुन बनले मित्र :



‘करण-अर्जुन’ या चित्रपटात शाहरूख- सलमान सर्वप्रथम एकत्र दिसले होते. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्येही मैत्री बहरली होती. ती सुद्धा एकमेकांची रूम शेअर करण्याइतकी.  होय, जयपूरबाहेर  या चित्रपटाचे शूटींग झाले. या सेटवर शाहरूख- सलमान दोघांनीही धम्माल मस्ती केली. चित्रपटाचे शूटींग संपले तसे दोघेही दिल्लीला पोहोचले. याठिकाणी दोघांनीही रात्रभर पार्टी केली होती. जयपूरमधील शूटींगदरम्यान शाहरूख-सलमान एका हॉटेलमध्ये थांबले होते. या हॉटेलमधील रूम्स शेअर करण्याचा किस्सा स्वत: सलमानने एका मुलाखतीदरम्यान शेअर केला होता. हॉटेलच्या रूम्स अगदीच लहान होत्या. याचदरम्यान मॉडेल जेसिका लाल(सध्या आपल्यात नाही) काही मित्रांसोबत आम्हाला भेटायला आली. जेसिका शाहरूखच्या रूममध्ये थांबल्यामुळे शाहरूख काही दिवसांसाठी माझ्या रूममध्ये शिफ्ट झाला होता.  याठिकाणी एकच टेलिफोन लाईन होती. पण ममता कुलकर्णी किंवा राकेश रोशन दोघेही या लाईनवर कायम बिझी असायचे. मग काय मी आणि शाहरूख ४० किमी अंतर पार करून फोन करायला जायचो. शाहरूख त्याच्या पत्नीशी आणि मी माझ्या गर्लफ्रेन्डश्ी बोलायचो, असे सलमानने या मुलाखतीत सांगितले होते.  

तरीही मैत्री होती कायम :



‘करण-अर्जुन’नंतर सलमान-शाहरूख हे दोघे मित्र दोघेही एकमेकांच्या चित्रपटात कॅमिओ करताना दिसले. सलमानने शाहरूखच्या ‘कुछ कुछ होता है’मध्ये कॅमिओ केला. तर शाहरूख सलमानच्या ‘हर दिल जो प्यार करेगा’मध्ये कॅमिओ करताना दिसला. २००७ मध्ये शाहरूखच्याच होम प्रॉडक्शनच्या ‘ओम शांती ओम’मध्येही सलमान झळकला. यादरम्यान शाहरूख श्रेष्ठ की सलमान श्रेष्ठ अशी बरीच स्पर्धा झाली. पण या स्पर्धेचा शाहरूख-सलमानच्या मैत्रीवर कुठलाही परिणाम झाला नाही.

कधी आणि कसे बिनसले?

‘चलते-चलते’ या शाहरूखच्या सिनेमाचे शूटींग सुरु असताना त्याच्यात आणि सलमानमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली. या चित्रपटासाठी सर्वप्रथम ऐश्वर्या रायला (सलमानची तत्कालीन गर्लफ्रेन्ड) साईन करण्यात आले होते. पण कुठल्याशा कारणावरून सलमानने ‘चलते-चलते’च्या सेटवर जाऊन मोठा धिंगाणा घातला. यानंतर आणखी ड्रामा नको म्हणून शाहरूखने ऐश्वर्याला लगेच या चित्रपटातून डच्चू दिला. येथून सलमान-शाहरूखे बिनसले. यानंतर २००८ मध्ये कॅटरिना कैफच्या बर्थ-डे पार्टीत दोघांमधील मैत्रीची जागा वैराने घेतली. १६ जुलै २००८च्या रात्री रंगलेल्या या पार्टीत सलमान व शाहरूखमध्ये भांडण झाले आणि दोघेही एकमेकांचे शत्रू झाले. या भांडणामुळे बॉलिवूडच नव्हे तर दोघांचे चाहतेही दोन गटात विभागले गेले. दोघेही यानंतर कधीच एकत्र दिसले नाही.

- आणि ‘इफ्तार’ झाला गोड :



सलमान व शाहरूख या दोघांमधील कोल्ड वॉर पाच वर्षे चालला आणि २०१३ मध्ये बाबा सिद्दीकी यांच्या ‘इफ्तार’ पार्टीत संपला. या पार्टीत दोघेही सगळे मतभेद विसरून एकमेकांची गळाभेट घेताना दिसले. यानंतर सलमानची बहीण अर्पिताच्या लग्नात शाहरूख सामील झाला आणि दोघांमध्येही मैत्रीचे नवे पर्व सुरु झाले. आता तर ही मैत्री चांगलीच फुलली आहे. भल्या पहाटे एकत्र सायकलिंग करण्यापासून ते एकमेकांचे सिनेमे प्रमोट करण्यापर्यंत ती पोहोचली आहे.

सिनेमात येणार का एकत्र? :



शाहरूख आणि सलमान अनेकवर्षांनंतर एक अवार्ड शो  एकत्र होस्ट करताना दिसणार आहेत. ब-याच वर्षांपासून या ‘करण-अर्जुन’ला एकत्र पाहण्याची इच्छा त्यांचे तमाम चाहते बाळगून होते. अवार्ड शोच्या निमित्ताने का होईना ही जोडी एकत्र दिसणार आहे. अर्थात भविष्यात मोठ्या पडद्यावर या दोघांना एकत्र पाहण्याची तमाम रसिकांची इच्छा आहे. ही इच्छा कधी पूर्ण होतेयं, ते बघू!

Web Title: The story behind Shahrukh-Salman's 'friendship and animosity' story ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.