स्टर्लिंग रिझर्व्ह म्युझिकचे 'यो यो' गाणे झाले लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 19:15 IST2019-04-05T19:15:06+5:302019-04-05T19:15:24+5:30

स्टर्लिंग रिझर्व्ह म्युझिक प्रोजेक्टने या व्यासपीठावर चौथ्या ट्रॅकचे अनावरण केले. यो यो असे या गाण्याचे नाव आहे.

Sterling Reserve Music's 'Yo Yo' song started | स्टर्लिंग रिझर्व्ह म्युझिकचे 'यो यो' गाणे झाले लाँच

स्टर्लिंग रिझर्व्ह म्युझिकचे 'यो यो' गाणे झाले लाँच

अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्सने युनिव्हर्सल म्युझिक इंडियाच्या भागीदारीत स्टर्लिंग रिझर्व्ह म्युझिक प्रोजेक्ट या अशाप्रकारच्‍या पहिल्या प्लॅटफॉर्मच्‍या अधिकृत अनावरणाची घोषणा केली, ज्यातून भारतातून उगवत्या संगीत प्रतिभेचा शोध घेऊन, विकसित करुन जागतिक पातळीवर त्‍यांना चालना दिली जाईल. या कार्यक्रमात स्टर्लिंग रिझर्व्ह म्युझिक प्रोजेक्टने या व्यासपीठावर चौथ्या ट्रॅकचे अनावरण केले. यो यो असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणे आर. एस. चौहान इक्का या ख्यातनाम पंजाबी रॅपर आणि रिषी रिच या ख्यातनाम संगीत निर्मात्याने मिळून केले आहे.


या अनावरणावेळी देवराज सन्याल, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी युनिव्हर्सल म्युझिक आणि एमी म्युझिक, इंडिया आणि दक्षिण आशिया, विक्रम बासू,सीओओ, अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स आणि ऑलिव्हियर रॉबर्ट-मर्फी, जागतिक प्रमुख, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि ब्रँड्स यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली. त्यांनी या प्लॅटफॉर्मबाबत माहिती दिली आणि याच्‍या एकूणच दृष्टिकोनाबाबत सांगितले. त्यानंतर अलीकडेच लॉन्‍च झालेले कलाकार आणि त्यांचे ट्रॅक्स- 'हिअर मी' हे अनुष्काचे गाणे, 'दिल मेरा' हे लेफ्ट टर्नचे गाणे आणि 'ब्रोकन' हे अर्जुनाजा यांचे गाणे यांचे सादरीकरण झाले. 
जागतिक पातळीवर स्टर्लिंग रिझर्व्ह म्युझिक प्रोजेक्टवर अनावरण होणारा चौथा ट्रॅक योयो होता आणि तो आर.एस. चौहान आणि इक्का यांचा हाय एनर्जी परफॉर्मन्स होता.
पंजाबी रॅपर, इक्का म्हणाला की, “मला स्टर्लिंग रिझर्व्ह म्युझिक प्रोजेक्टवर आर.एस. चौहानचा आवाज जगासमोर सादर करताना खूप आनंद होत आहे. स्टर्लिंग रिझर्व्ह म्युझिक प्रोजेक्टसारखे व्यासपीठ आर. एस. चौहानसारख्या युवा कलाकारांना एक व्यासपीठ देते आणि अशा अर्थपूर्ण पद्धतीने त्यांना सादर करते हे पाहणे आनंददायी आहे. मला रिषी रिचसोबत काम करण्‍यास मिळाल्‍याने आणि योयो गाण्यासाठी त्याचे सहकार्य मिळाले याचा खूप आनंद होत आहे.''  
 

Web Title: Sterling Reserve Music's 'Yo Yo' song started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.