‘ती’च्या सोबत राहून मला आनंद लुटायचाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2016 10:45 IST2016-08-28T05:15:00+5:302016-08-28T10:45:00+5:30

 शाहीद कपूर आणि मीरा राजपूत कपूर यांच्या घरी एका ‘परी’ने जन्म घेतला. त्यामुळे  सध्या कपूर कुटुंबियांमध्ये  आनंदाचे वातावरण आहे. ...

Staying with 'she' and enjoying me! | ‘ती’च्या सोबत राहून मला आनंद लुटायचाय!

‘ती’च्या सोबत राहून मला आनंद लुटायचाय!

 
ाहीद कपूर आणि मीरा राजपूत कपूर यांच्या घरी एका ‘परी’ने जन्म घेतला. त्यामुळे  सध्या कपूर कुटुंबियांमध्ये  आनंदाचे वातावरण आहे. मीराने सिटी हॉस्पिटलमध्ये तिच्या बाळाला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर दोन तासांनी शाहिदने सोशल साईटवर ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

या सर्व गोड अनुभवानंतर तो म्हणतो,‘ मला फक्त ‘त्या’ वेळी तिच्यासोबत राहायचं होतं. आमचं बाळ या जगात येत असतांना मला तिच्यासोबत राहण्याची खुप इच्छा होती. मला ते क्षण एन्जॉय करायचे होते. असे अनुभव तुम्ही फक्त एकदा किंवा दोनदाच घेऊ शकता.

मी असे ऐकले होते की, स्टारकिड्सची नेहमी तक्रार असते की, त्यांचे पालक त्यांच्यासोबत जास्त नसतात. पण, मला तसे होऊ द्यायचे नव्हते. आणि मला त्या स्टारप्रमाणेही व्हायचे नव्हते.’ शाहिद त्याचे काम आॅक्टोबरमध्ये सुरू करणार आहे. सध्या तो बाबा असणं एन्जॉय करतोय.

meera rajput kapoor

Web Title: Staying with 'she' and enjoying me!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.