राजकीय सेन्सॉरशिपचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2016 11:04 IST2016-01-16T01:09:00+5:302016-01-31T11:04:19+5:30

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत करण्याऐवजी शाहरु खने चेन्नईतल्या पूरग्रस्तांना एक कोटींची मदत केली. शाहरु खचे हे वागणे दुटप्पी असल्याचा ...

The State Censorship Shot | राजकीय सेन्सॉरशिपचा फटका

राजकीय सेन्सॉरशिपचा फटका

ज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत करण्याऐवजी शाहरु खने चेन्नईतल्या पूरग्रस्तांना एक कोटींची मदत केली. शाहरु खचे हे वागणे दुटप्पी असल्याचा आरोप करीत त्याच्या 'दिलवाले' या चित्रपटाला विरोध केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेने हा विरोधाचा सूर आवळला आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्डापेक्षा राजकीय सेन्सॉरशिपच अधिक भारी पडतेय का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण वेगवेगळे असले तरी चित्रपटांना राजकीय विरोध ही बाब आता नित्याचीच झाली आहे. याआधीही अनेक हिंदी, मराठी चित्रपटांना याचा सामना करावा लागला आहे. याचा मोठा आर्थिक फटका या चित्रपटांना बसला आहे. त्याचाच हा एक आढावा..
वाद, विरोध आणि तडजोड
ठाकरे बंधूंमधील वादाची पार्श्‍वभूमी असलेला अवधूत गुप्ते दिग्दर्शित 'झेंडा' हा मराठी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. शिवसेनाप्रमुखांकडून संमती घेतल्यानंतर गुप्ते यांनी झेंडा चित्रपट पाहण्यासाठी राज ठाकरे यांना विनंती केली. पण राज यांनी हा चित्रपट पाहिला नाही. मात्र येथेच चित्रपटाचे अडथळे दूर झाले नाहीत. 'स्वाभिमान' संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी चित्रपटातील मालवणकर व्यक्तिरेखेला आक्षेप घेतल्यामुळे गुप्ते यांना चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलावे लागले. काही संदर्भ बदल्यानंतर चित्रपट प्रदर्शित करण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र राजकारण्यांचा हा गुंता सोडविताना गुप्ते यांची चांगलीच दमछाक झाली. पुन्हा राजकीय चित्रपट बनविणार नसल्याचेच त्यांनी जाहीर केले. पुढे महेश मांजरेकर दिग्दर्शित 'शिक्षणाच्या आयचा घो' या चित्रपटाच्या नावावरून देखील वाद निर्माण झाला. नावातील 'आयचा घो' या शब्दावर मराठा महासंघाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे मांजरेकर यांना चित्रपट सुरू होण्यापूर्वी नावाबाबत दिलगिरी व्यक्त करावी दिलवाले
'नाम'ला करा मदत 
शाहरु खचा दिलवाले पाहायला महाराष्ट्रातील जनतेने चित्रपटगृहात जाऊ नये. हा चित्रपट पाहण्याऐवजी प्रेक्षकांनी तिकिटाचे पैसे नाना पाटेकर-मकरंद अनासपुरे यांच्या 'नाम' संस्थेला द्यावेत, असे आवाहन मनसे चित्रपट कर्मचारी सेनेने जनतेला केले आहे. या आवाहनामुळे हा चित्रपट राजकीय सेन्सॉरशिपच्या कात्रीत अडकला आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मात्र ही पक्षाची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे. मग हे आवाहन करणारे कोण आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
माय नेम इज खान
पाकिस्तानी खेळाडूंचा कैवार घेणार्‍या शाहरुख खानला शिवसेनेच्या कडव्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्याचा 'माय नेम इज खान' हा चित्रपट अडचणीत आला होता. पुढे कसाबसा तो सेनेच्या तावडीतून सुटला. मात्र लगेचच आणखी एक वाद निर्माण झाला. कोलकाताच्या टीपू सुलतान मशिदीचे शाही ईमाम सैयद नूर-उल-रहमान बरखती यांनी मुस्लिम समुदायास शाहरुखच्या

Web Title: The State Censorship Shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.