गुपचुप लग्नाच्या बेडीत अडकले स्टार्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 06:07 IST2016-03-03T13:07:54+5:302016-03-03T06:07:54+5:30

प्रिती झिंटाच्या लग्नाची गोड बातमी आता सर्वांना कळली आहे.  काही दिवसाअगोदरपर्यंत प्रिती आपल्या लग्नाबाबतची चर्चा टाळत होती आणि आता ...

Stars stuck in a secret wedding fiance | गुपचुप लग्नाच्या बेडीत अडकले स्टार्स

गुपचुप लग्नाच्या बेडीत अडकले स्टार्स

रिती झिंटाच्या लग्नाची गोड बातमी आता सर्वांना कळली आहे.  काही दिवसाअगोदरपर्यंत प्रिती आपल्या लग्नाबाबतची चर्चा टाळत होती आणि आता तीने गुपचुप लग्न उरकले आहे. आधी नकार आणि नंतर गुपचुप लग्न करणाºया बॉलिवूडच्या नायिकांमध्ये प्रिती एकमेव स्टार नाही. या यादीत धर्मेंद्र-हेमा मालिनी (१९७९) पासून  रानी मुखर्जी-आदित्य चोपडा पर्यंत अनेक नावांचा समावेश आहे.

प्रदीर्घ प्रेमप्रकरणानंतर धर्मेंद्रने ड्रीमगर्ल हेमा मालिनीशी आॅगस्ट १९७९ मध्ये लग्न करून सर्वांना चकीत केले होते. धर्मेंद्र विवाहित होता आणि पहिली पत्नी प्रकाश कौरशी त्याने घटस्फोटदेखील घेतला नव्हता.  ८० च्या दशकात असाच एक किस्सा समोर आला  जेव्हा दिलीप कुमार यांच्या दुसºया लग्नाची बातमी आली. बातमी ही होती की, हैदराबाद मध्ये ट्रेजडी किंगने गुपचुप पद्धतीने अस्मां नावाच्या एका खातूनला आपली पत्नी बनविले होते. एका सिने पत्रिकेने या लग्नाचा फोटोदेखील छापला होता. नंतर सांगितले गेले होते की, सायरा बानोच्या दबावामुळे दिलीप कुमार यांनी अस्मांला घटस्फोट दिला होता.

९० व्या दशकात बोनी कपूर आणि श्रीदेवीच्या लग्नाची बातमी देखील अशाच अचानक आली होती.
बोनी कपूरचे अगोदर लग्न झालेले होते, आणि तो दोन मुलांचा बाप होता. त्याने आपली पत्नी मोनाला घटस्फोट देऊन श्रीदेवी सोबत लग्न केले. आता बोनी आणि श्रीदेवी दोन मुलींचे आई-वडील आहेत. ९० व्या दशकात सैफ अली खानने आपल्यापेक्षा १२ वर्ष मोठ्या वयाच्या अमृता सिंहशी लग्न करून सर्वांना चकीत केले होते. मनोरंजक गोष्ट ही होती की, लग्नाच्या एक दिवसआधी ज्या वृत्तपत्रात त्याच्या लग्नाची बातमी छापली होती, सैफने त्यावरून मोठा हंगामा केला होता आणि हंगामा करून कोर्टात गेला जिथे अमृताशी कोेर्ट मॅरेज केले. 

Web Title: Stars stuck in a secret wedding fiance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.