प्रतीक्षा कायम! RRR चं प्रदर्शन लांबणीवर; प्रेक्षकांना पाहावी लागणार पुन्हा वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 06:34 PM2021-09-12T18:34:05+5:302021-09-12T18:36:54+5:30

RRR: पुन्हा एकदा या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. याविषयी चित्रपटाच्या निर्मात्यांनी अधिकृत ट्विटदेखील केलं आहे.

ss rajamouli pushed the release date of alia bhatt ajay devgn ram charan jr ntr starrer rrr | प्रतीक्षा कायम! RRR चं प्रदर्शन लांबणीवर; प्रेक्षकांना पाहावी लागणार पुन्हा वाट

प्रतीक्षा कायम! RRR चं प्रदर्शन लांबणीवर; प्रेक्षकांना पाहावी लागणार पुन्हा वाट

googlenewsNext
ठळक मुद्दे‘आरआरआर’ हा बिग बजेट चित्रपट असून सुमारे ४५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

भव्य सेट, दमदार अॅक्शन आणि डोळे दिपवणारी दृश्य यासाठी एस.एस. राजामौली यांचे चित्रपट खासकरुन ओळखले जातात. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. त्यातच त्यांच्या बहुप्रतिक्षीत RRR या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण, पुन्हा एकदा या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. याविषयी चित्रपटाच्या निर्मात्यांनी अधिकृत ट्विटदेखील केलं आहे.

RRR च्या अधिकृत ट्विटर पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली असून यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी हा चित्रपट १३ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.


 

"चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित करता यावा यासाठी पोस्ट प्रोडक्शन जवळपास पूर्ण होत आलं आहे. मात्र, आम्ही चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलत आहोत. तसंच अद्यापही चित्रपटगृह पूर्णपणे सुरु न झाल्यामुळे इतक्यात नवीन रिलीज डेटदेखील सांगू शकत नाही. पण, जशी सगळी चित्रपटगृह पूर्णपणे सुरु होतील तसं लगेचच हा चित्रपट तुमच्या भेटीला घेऊन येऊ", असं ट्विट RRR च्या ट्विटर पेजवर करण्यात आलं आहे. 

दरम्यान, यापूर्वी RRR हा १३ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. या चित्रपटात एनटीआर ज्युनिअर, राम चरण, अजय देवगण आणि आलिया भट्ट सारखे मोठे कलाकार दिसणार आहेत. ‘आरआरआर’ हा बिग बजेट चित्रपट असून सुमारे ४५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि तामिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: ss rajamouli pushed the release date of alia bhatt ajay devgn ram charan jr ntr starrer rrr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.