​एसआरके म्हणतो, माझी भूमिका आर्यन वा अबरामने साकारावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 18:56 IST2016-04-13T01:55:06+5:302016-04-12T18:56:51+5:30

येत्या शुक्रवारी शाहरूखचा ‘फॅन’ हा चित्रपट रिलीज होतोय. या चित्रपटासाठी शाहरूखने जोरदार प्रमोशन चालवले आहे. प्रमोशनसाठी आज शाहरूख दिल्लीत ...

SRK says, my role is Aryan or Abram Saakkavi | ​एसआरके म्हणतो, माझी भूमिका आर्यन वा अबरामने साकारावी

​एसआरके म्हणतो, माझी भूमिका आर्यन वा अबरामने साकारावी

त्या शुक्रवारी शाहरूखचा ‘फॅन’ हा चित्रपट रिलीज होतोय. या चित्रपटासाठी शाहरूखने जोरदार प्रमोशन चालवले आहे. प्रमोशनसाठी आज शाहरूख दिल्लीत पोहोचला. यावेळी मीडियाशी त्याने मनमोकळ्या गप्पा मारल्या.  शाहरूख खानवर बायोपिक बनले तर त्यात शाहरूखची भूमिका कोण साकारेल, असा प्रश्न शाहरूखला यावेळी विचारण्यात आला. त्यावर शाहरूखने मोठे गोड उत्तर दिले. माझ्यावर बायोपिक बनण्याइतका मी मोठा आहे, असे मला वाटत नाही. माझ्यापेक्षा कलरफुल आयुष्य जगणारे अनेक जण आहेत, त्यांच्यावर बायोपिक बनू शकतात. माझे आयुष्य बायोपिक बनण्याइतपत आकर्षक आहे, वा नाही, हे मला खरचं ठाऊक नाही. तरिही बायोपिक बनत असेल तर डायरेक्टर कोण असेल, हेही तुम्ही मलाच विचाराल.   माझ्यावर कोण बायोपिक बनवणार आणि त्यात माझी भूमिका कोण साकारणार, हे सगळे मलाच सांगावे लागणार, म्हणजे गंमतच. पण तरिही सगळे योग जुळून आले तर माझ्या भूमिकेसाठी आर्यन आणि अबराम माझी चॉईस असतील, असे शाहरूख यावेळी म्हणाला.

Web Title: SRK says, my role is Aryan or Abram Saakkavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.