श्रीदेवीच्या डान्सवरही तिचे फॅन्स व्हायचे फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 12:06 IST2018-02-25T06:36:37+5:302018-02-25T12:06:37+5:30

श्रीदेवी ही खूप चांगली अभिनेत्री असल्याचे आपणा सर्वांनाच माहीत आहे. पण ती एक अभिनेत्रीसोबतच एक खूप चांगली डान्सर देखील ...

Sridevi's dance should also be her fancy | श्रीदेवीच्या डान्सवरही तिचे फॅन्स व्हायचे फिदा

श्रीदेवीच्या डान्सवरही तिचे फॅन्स व्हायचे फिदा

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small;">श्रीदेवी ही खूप चांगली अभिनेत्री असल्याचे आपणा सर्वांनाच माहीत आहे. पण ती एक अभिनेत्रीसोबतच एक खूप चांगली डान्सर देखील होती. तिने चांदनी, लम्हे  यांसारख्या चित्रपटातून हे सिद्ध केले आहे. लम्हे या चित्रपटातील मोरनी बागा मा बोले, चांदनी या चित्रपटातील  मेरेहातो में नौ नौ चुडिया है या गण्यावरील श्रीदेवी च्या नृत्याची आज देखील तारीफ केली जाते.
श्रीदेवीच्या जास्तीत जास्त गाण्याची कोरिओग्राफी ही सरोज खान यांनी केली आहे. सरोज खान या त्याकाळातील सगळ्यात चांगल्या कोरिओग्राफर असल्याचे मानले जात असे. त्यांनी त्यांच्या अनेक मुलाखतीमध्ये श्रीदेवी ही बॉलीवूड मधील सगळ्यात चांगली डान्सर असल्याचे कबूल केले आहे. श्रीदेवी ही तिच्या अभिनय इतकी मेहनत तिच्या डान्स वर देखील घ्यायची आणि त्यासाठी कित्येक दिवस प्रॅक्टिस करायची. सरोज खान यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की श्रीदेवी ही खूप च चांगली डान्सर होती. तिच्या डान्सवर ती प्रचंड मेहनत घ्यायची. आजच्या काळात अभिनेत्री केवळ एक गाण्यासाठी अनेक दिवस प्रॅक्टिस  करत आहेत असे आपल्याला पाहायला मिळत नाही. पण श्रीदेवी एका गाण्यासाठी अनेक दिवस द्यायची. एका स्टेप साठी देखील कित्येक तास द्यायला तिची हरकत नसायची. 
 ‘श्रीदेवी’ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे

Also Read : सदमा!!! अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Web Title: Sridevi's dance should also be her fancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.