श्रीदेवीने केला धक्कादायक खुलासा! तुम्हीही वाचा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2017 10:34 IST2017-05-14T05:04:02+5:302017-05-14T10:34:02+5:30
अभिनेत्री श्रीदेवीचा‘मॉम’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रीदेवी एका सिंगींग रिअॅलिटी शोमध्ये आली होती.यावेळी श्रीदेवीने ...

श्रीदेवीने केला धक्कादायक खुलासा! तुम्हीही वाचा!!
अ िनेत्री श्रीदेवीचा‘मॉम’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रीदेवी एका सिंगींग रिअॅलिटी शोमध्ये आली होती.यावेळी श्रीदेवीने एक धक्कादायक खुलासा केला. होय, माझ्या मुली जान्हवी आणि खुशी या दोघींनी माझे अंगाईगीत गाणे अजिबात आवडत नव्हते, असे तिने सांगितले. माझा आवाजचं असा होता की, त्या माझ्या तोंडून कुठलेही गाणे ऐकायला उत्सूक नसायच्या. जान्हवी व खुशी लहान होत्या तेव्हा,मी जेव्हा केव्हा त्यांना गोष्ट सांगायचे तेव्हा त्या मुळीच झोपायच्या नाहीत. पण मी अंगाईगीत गायला लागले की, त्या लगेच झोपी जात. कारण माझा आवाज त्या सहन करू शकायच्या नाहीत आणि मी गाणे थांबवावे म्हणून त्या अगदी लगेच झोपून जात, असे श्रीदेवी म्हणाली. माझ्या दोन्ही मुली आधीपासूनच समजुतदार आहेत. मी त्यांच्यावर कधीही माझे विचार लादले नाहीत. किंबहुना त्यांच्यावर माझ्या विचारांची बळजबरी लादण्याची मला गरजच भासली नाही. मी आईपेक्षा त्या दोघींची चांगली मैत्रिण आहे. जान्हवी व खुशी या दोघींनाही जंक फूड अजिबात आवडत नाही. त्या दोघींनी कधी कधी जंक फूड खावे, असे अनेकदा मला वाटते, असेही ती म्हणाली. कुठलीही महिला आपल्या आईशिवाय आणि आई बनल्याशिवाय अधुरी आहे, असेही ती म्हणाली.
ALSO READ : जान्हवी कपूरच्या लेटेस्ट फॅशन सेन्सनी केली निराशा!
अभिनेत्री श्रीदेवी सन २०१२ मध्ये आलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’मध्ये अखेरची दिसली होती. या चित्रपटात तिने आईची भूमिका साकारली होती. केवळ कुटुंब हेच तिचे जग असते. आता श्रीदेवी पुन्हा ‘मॉम’ची भूमिका पडद्यावर जिवंत करणार आहे. अर्थात यातील तिची भूमिका ‘इंग्लिश विंग्लिश’मधील भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे. या चित्रपटात श्रीदेवी हिच्याशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत आहेत. श्रीदेवीचा लाडका हबी बोनी कपूर हा या चित्रपटाचा निर्माता आहे. तर रवि उदयवार यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. केवळ श्रीदेवी, नवाजुद्दीन व अक्षय खन्नाचा दमदार अभिनयच नाही तर या चित्रपटाचा आणखी एक प्लस पॉईन्ट असणार आहे. हा प्लस पॉईन्ट आहे, एआर रहमान यांचे संगीत. येत्या जुलैमध्ये हा चित्रपट आपल्या भेटीस येतो आहे.