​२५ वर्षानंतर एकत्र दिसणार श्रीदेवी अन् संजय दत्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2017 14:39 IST2017-07-10T09:09:28+5:302017-07-10T14:39:28+5:30

सन १९९३ मध्ये आलेल्या ‘गुमराह’ या चित्रपटात संजय दत्त व श्रीदेवी या दोघांची जोडी आपण पाहिली होती. यानंतर ही ...

Sridevi and Sanjay Dutt appear together after 25 years! | ​२५ वर्षानंतर एकत्र दिसणार श्रीदेवी अन् संजय दत्त!

​२५ वर्षानंतर एकत्र दिसणार श्रीदेवी अन् संजय दत्त!

१९९३ मध्ये आलेल्या ‘गुमराह’ या चित्रपटात संजय दत्त व श्रीदेवी या दोघांची जोडी आपण पाहिली होती. यानंतर ही जोडी कधीच एकत्र दिसली नाही. पण आता तब्बल २५ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. ‘२ स्टेट्स’ फेम दिग्दर्शक अभिषेक बर्मन यांच्या आगामी चित्रपटात श्रीदेवी व संजय दत्त एकत्र येणार आहेत.



श्रीदेवीने या चित्रपटासाठी आधीच होकार दिला आहे. चर्चा खरी मानाल तर यात श्रीदेवी व संजय दत्तसोबत वरूण धवन, आलिया भट्ट आणि सोनाक्षी सिन्हा लीड रोलमध्ये असतील. करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला हा चित्रपट प्रोड्यूस करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करणचे डॅड यश जोहर यांच्या डोक्यातील ही कथा आहे. यश जोहर यांना या कथेवर चित्रपट बनवायचा होता. त्यांचे ते अधुरे स्वप्न करण पूर्ण करणार आहे. अर्थात त्याने ही जबाबदारी अभिषेकवर सोपवली आहे. तूर्तास अभिषेक या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करतो आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला या चित्रपटाचे शूटींग सुरु होणे अपेक्षित आहे. या चित्रपटाचे नाव आधी ‘कलंक’ असल्याचे कळले होते. यानंतर त्याचे ‘सिद्दत’ असे नामकरण झाल्याची बातमी आली. पण सूत्रांचे मानाल तर या चित्रपटाचे नाव अद्याप ठरायचे आहे. चित्रपटाचे नाव, त्याची फायनल स्टारकास्ट हे जाणून घ्यायला तुम्ही आम्ही उत्सूक आहोच. पण त्याहीपेक्षा श्रीदेवी आणि संजय दत्त ही जोडी पुन्हा पाहण्यास अधिक उत्सूक आहोत. आपली ही उत्सुकता कधीपर्यंत ताणली जाते, ते बघूच.
हा चित्रपट एक पीरियड लव्ह स्टोरी असेल. भारतातील अनेक शहरात या चित्रपटाचे शूटींग होणार आहे.

Web Title: Sridevi and Sanjay Dutt appear together after 25 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.