​हृतिक रोशनचे कुटुंबियांसोबत स्पेशल फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 10:42 IST2017-01-03T20:58:04+5:302017-01-04T10:42:34+5:30

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचे लिसा हेडन सोबतचे ओगइंडिया मॅगझिनसाठी केलेले फोटोशूट चांगले व्हायरल होत आहे. ...

Special Photoshoot with Hrithik Roshan's family | ​हृतिक रोशनचे कुटुंबियांसोबत स्पेशल फोटोशूट

​हृतिक रोशनचे कुटुंबियांसोबत स्पेशल फोटोशूट

ong>बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचे लिसा हेडन सोबतचे ओगइंडिया मॅगझिनसाठी केलेले फोटोशूट चांगले व्हायरल होत आहे. आता पुन्हा एकदा हृतिक रोशन हॅलो या मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकला आहे. यावेळी मात्र तो कुण्या अभिनेत्रीसोबत हॉट पोझ देताना दिसत नसून आपल्या स्पेशल व्यक्तींसोबत दिसतोय. 

हृतिक रोशन आणि लिसा हेडन यांनी नुकतेच एका कव्हरपेजसाठी हॉट अ‍ॅण्ड सिझलिंग फोटोशूट केले आहे. या फोटोत हृतिकचे स्ट्राँग मसल्स आणि लिसाचा हॉट अंदाज लक्ष वेधून घेतो. हृतिक व लिसा हेडन यांचे हे फोटोशूटची चांगलीच चर्चा होत आहे. आता मात्र त्याचे आणखी एक फ ोटोशूटची चांगली चर्चा होऊ शकते. यामागचे कारणही तसेच आहे कारण या मॅगझिनसाठी हृतिकने आपल्या जीवलग व खास व्यक्तींसोबत फोटोशूट केले आहे.

hrithik Roshan Photoshoot with father and son for hello magazine 

आश्चर्य वाटून घेऊ नका, हृतिकच्या या जीवलग व्यक्ती म्हणजे त्याचे वडील राकेश रोशन व मुले हृेरान आणि हृदियान एकाच फोटोमध्ये त्याच्या चाहत्यांना पहायला मिळणार आहेत. हॅलो मॅगझिनने ‘मीट द रोशन्स’ या मथळ्या खाली रोशन कुटुंबाला आपल्या कव्हरपेजवर जागा दिली आहे.  यात त्याचे वडील राकेश रोशन यांच्याशी नाते व मुलांविषयी वाटत असलेला जिव्हाळा याची माहिती देण्यात आली आहे. नुकताच हृतिकने आपल्या मुलांसोबत हॉलिडे एन्जॉय केल्याच्या बातम्या आल्या होत्या विशेष म्हणजे यावेळी त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझेन खान देखील सोबत होती. 

hrithik Roshan Photoshoot with father and son for hello magazine

राकेश रोशन निर्मित व संजय गुप्ता दिग्दर्शित हृतिक रोशनचा आगामी ‘काबिल’ हा चित्रपट २५ जानेवारीला रिलीज होत आहे. या चित्रपटात त्यासोबत यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आपल्या अंध पत्नीच्या खुनाचा बदला घेणाºया अंध पतीची भूमिका हृतिकने या चित्रपटात साकारली आहे. 

Web Title: Special Photoshoot with Hrithik Roshan's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.