'मी विराट कोहली सारखाच दिसतो, त्याची भूमिका...' अभिनेता रामचरणने व्यक्त केली इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 04:46 PM2023-03-20T16:46:48+5:302023-03-20T16:48:41+5:30

माजी कर्णधार विराट कोहलीचे चाहते जगभरात आहेत. त्याच्या आयुष्यावर सिनेमा करायची संधी मिळाली तर कोणताही अभिनेता एका पायावर तयार होईल.

south actor ramcharan says he looks like cricketer virat kohli wish to work in his biopic | 'मी विराट कोहली सारखाच दिसतो, त्याची भूमिका...' अभिनेता रामचरणने व्यक्त केली इच्छा

'मी विराट कोहली सारखाच दिसतो, त्याची भूमिका...' अभिनेता रामचरणने व्यक्त केली इच्छा

googlenewsNext

भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) चाहते जगभरात आहेत. त्याच्या आयुष्यावर सिनेमा करायची संधी मिळाली तर कोणताही अभिनेता एका पायावर तयार होईल. विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये काम करण्यासाठी साऊथ अभिनेता रामचरण (Ramcharan) उत्सुक असल्याचं दिसतंय. इतकंच नाही तर मी त्याच्यासारखाच दिसतो असं म्हणत त्याने ही इच्छा व्यक्त केली आहे.

अभिनेता रामचरण 'आरआरआर'(RRR) सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतीच आरआरआरची टीम ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावरुन परतली आहे. सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याला ऑस्कर मिळाला आणि RRR च्या टीमने एकच जल्लोष केला. यानंतर अभिनेता रामचरणने एका मुलाखतीत सांगितले, 'मला क्रीडाविषयक सिनेमा करण्याची इच्छा आहे. मला विराट कोहलीची भूमिका साकारायला आवडेल. विराटचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्याच्या भूमिकेसाठी मला विचारणा झाली तर मी नक्कीच संधीचं सोनं करेल. मी दिसायलाही त्याच्यासारखाच आहे.'

रामचरणने ही इच्छा व्यक्त केल्यानंतर आता विराट कोहलीच्या बायोपिकची चर्चा जोर धरु लागली आहे. तसंच चाहत्यांनाही रामचरणला विराटच्या भूमिकेत बघायला आवडेल अशा कमेंट्स येत आहेत.रामचरण सध्या 'RC15' या आगामी सिनेमाच्या शूटमध्ये व्यस्त आहे. यामध्ये किआरा अडवाणी मुख्य अभिनेत्री असणार आहे.

Web Title: south actor ramcharan says he looks like cricketer virat kohli wish to work in his biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.