Sonu Sood: सोनू सूदचा ट्रेनच्या दारात लटकून प्रवास, रेल्वे प्रशासनाने फटकारल्यानंतर मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 02:07 PM2023-01-05T14:07:46+5:302023-01-05T14:09:36+5:30

सोनूचा ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने फटकारले.

Sonu Sood video on train door, indian railway slams him, Sonu apologizes | Sonu Sood: सोनू सूदचा ट्रेनच्या दारात लटकून प्रवास, रेल्वे प्रशासनाने फटकारल्यानंतर मागितली माफी

Sonu Sood: सोनू सूदचा ट्रेनच्या दारात लटकून प्रवास, रेल्वे प्रशासनाने फटकारल्यानंतर मागितली माफी

googlenewsNext

मुंबई- कोरोना काळात गरिबांना मदत केल्यामुळे बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला मोठी प्रसिद्धी मिळाली. कोरोना काळापासून त्याच्या चाहत्यांची संख्याही वाढत गेली. सोशल मीडियावरही त्याची मोठी फॅन फॉलोयिंग आहे. पण, एका चुकीमुळे रेल्वे विभागाने सोनूला फटकारले आहे. धावत्या ट्रेनच्या दारामध्ये बसून व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला, यामुळे त्याला माफी मागण्याची वेळ आली.

रेल्वेने सोनू सूदला फटकारले
सोनू सूदने 13 डिसेंबर रोजी ट्विटर आणि फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत तो धावत्या ट्रेनच्या दारात बसलेला दिसत आहे आणि बॅकग्राउंडला 'मुसाफिर हूं यारों' हे गाणं वाजत आहे. या कृत्यामुळे रेल्वेने सोनूला फटकारले आहे. उत्तर रेल्वेने 3 जानेवारी रोजी सोनुचे ट्विट रिट्विट केले आणि लिहिले, 'प्रिय सोनू सूद, तू देश आणि जगातील लाखो लोकांसाठी आदर्श आहेस. ट्रेनच्या पायऱ्यांवर प्रवास करणे धोकादायक आहे. अशा प्रकारच्या व्हिडिओमुळे तुमच्या चाहत्यांना चुकीचा संदेश जाऊ शकतो. कृपया असे करू नका. सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्या.'

सोनूने मागितली माफी 
याप्रकरणी सोनूने 5 जानेवारीला रेल्वेची माफी मागितली आहे. 'माफी मागतो. लाखो गरीब लोकांचे आयुष्य ट्रेनच्या दारात जाते, मला त्याचा अनुभव घ्यायचा होता, म्हणून बसलो. देशाची रेल्वे व्यवस्था सुधारल्याबद्दल धन्यवाद,' असे ट्विट सोनूने केले.

लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला
सोनूचा व्हिडिओ ट्विटरवर 6 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. शेकडो लोकांनी रिट्विट केले आहे. फेसबुकवर 2 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून 4 हजारांहून अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत. काही लोकांनी त्याला कमेंटमध्ये सावध राहण्यास सांगित

Web Title: Sonu Sood video on train door, indian railway slams him, Sonu apologizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.