लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या सोनू सूद, फराह खानला धक्काबुक्की; Video viral

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 12:19 PM2023-09-27T12:19:15+5:302023-09-27T12:20:15+5:30

Bollywood celebrity: सोनू सूद, फराह खान या कलाकारांनी VIP रांग सोडून सर्वसामान्यांसोबत उभं राहून बाप्पाचं दर्शन घेतलं.

sonu-sood-manushi-chhillar-farah-khan-at-lalbaugcha-raja-without-any-vip-privileges-stuck-in-crowd-video-viral | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या सोनू सूद, फराह खानला धक्काबुक्की; Video viral

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या सोनू सूद, फराह खानला धक्काबुक्की; Video viral

googlenewsNext

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. त्यामुळे मुंबईतही मानाचे गणपती पाहण्यासाठी, त्यांच्या दर्शनासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. यात खासकरुन लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनेक जण लांबून येत आहेत. विशेष म्हणजे यात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांचा समावेश आहे. आतापर्यंत शाहरुख खान (shahrukh khan), अदा शर्मा (adah sharma), शिल्पा शेट्टी (shilpa shetty) आणि सनी लिओनी (sunny leone) यांसारख्या अनेक कलाकारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मात्र, सध्या सोशल मीडियावर अभिनेता सोनू सूद आणि फराह खान यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या कलाकारांना चक्क धक्काबुक्की करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

नवसाला पावणारा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये हा बाप्पा मंडळातील सदस्यांच्या उर्मट वागण्यामुळे आणि दर्शनासाठी करण्यात येणाऱ्या भेदभावामुळे चर्चेत येत आहे. एकीकडे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक लांबच्या लांब रांगा लावत आहेत. तर, दुसरीकडे काही लोकांना VIP दर्शन दिलं जात आहे. त्यामुळे करण्यात येणाऱ्या या भेदभावामुळे अनेक भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे. यामध्येच अभिनेता सोनू सूद (sonu sood) , फराह खान, मानुषी छिल्लर (manushi chhillar), शेखर सुमन आणि स्मृती इराणी यांसारख्या कलाकारांनी VIP रांग सोडून सर्वसामान्यांसोबत उभं राहून बाप्पाचं दर्शन घेतलं. परंतु, यावेळी त्यांना प्रचंड मोठ्या गर्दीचा आणि धक्काबुक्कीचा सामना करावा लागला. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

सोनू सूद, शेखर सुमन, स्मृती इराणी आणि फराह खान (farah khan) यांसारख्या दिग्गज  व्यक्तींनी VIP रांगेत न जाता थेट सर्वसामान्यांसाठी असलेल्या रांगेत जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे या कलाकारांनी केलेल्या या कृतीमुळे सोशल मीडियावरुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अन्य कलाकार मंडळींनी या कलाकारांकडून काही तरी शिकावं, असा सल्लाही नेटकरी  सेलिब्रिटींना देत आहेत.

Web Title: sonu-sood-manushi-chhillar-farah-khan-at-lalbaugcha-raja-without-any-vip-privileges-stuck-in-crowd-video-viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.