Sonu Sood : ओडिशा अपघातातील मृतांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला सोनू सूद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 12:21 PM2023-06-07T12:21:25+5:302023-06-07T12:21:58+5:30

Coromandal Express Accident: पीडित कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी सोनू सूदने एका हेल्पलाइनची स्थापना केली आहे.

Sonu Sood came forward to help the relatives of the victims of the Odisha accident | Sonu Sood : ओडिशा अपघातातील मृतांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला सोनू सूद

Sonu Sood : ओडिशा अपघातातील मृतांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला सोनू सूद

googlenewsNext

ओडिशा रेल्वे अपघात घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. अजूनही अनेक जखमी, मृत लोक यात सापडत नसल्याचा बातम्या देखील येत आहेत. २०० हून अधिक लोक मृत्यू आणि ९०० हून अधिक जखमी झाल्यामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. अनेकांनी अपघाग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनेदेखील मदतीचा हात दिला आहे.  पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी त्याची खास टीम या कामाला लागली आहे. 

अभिनयाच्या पलिकडे जाऊन अनेकदा माणुसकी जपत अभिनेता सोनू सूदने अनेक सामाजिक काम केले आहे आणि आता पुन्हा सोनू ओडिशा अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांसाठी काम करताना दिसत आहे. त्याच्या टीमने हाती घेतलेल्या या पुढाकारांचा खुलासा करणारा एक व्हिडिओ सोनूने  शेअर केला आहे. त्याने ओडिशा रेल्वे अपघातग्रस्तांना त्यांचे जीवन पुनर्निर्माण करण्यात मदत करण्याचे वचन दिले आहे. अपघाग्रस्तांना त्यांचा व्यवसाय स्थापन करण्यात आणि शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्णय सोनूने घेतला आहे. सोनूची टीम या कुटुंबांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सक्रीयपणे काम करत आहेत. 

पीडित कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी सोनू सूदने एका हेल्पलाइनची स्थापना केली आहे. जेणेकरून ज्यांना मदतीचा हात हवा असेल अशी लोक या हेल्प लाईनच्या माध्यमातून सोनू सूदपर्यंत पोहचू शकतात. SMS द्वारे ९९६७५६ ७५२० या क्रमांकावर संपर्क साधून त्याच्या टीमशी जोडण्यासाठी मदत करणार आहे. एसएमएस मिळाल्यावर, त्यांची टीम त्वरित प्रतिसाद देईल आणि मदतीचा हात देणार आहे. सोनू सूदचा हा उपक्रम ओडिशा रेल्वे अपघातामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना नक्कीच मदत करणार आहे. अपघाग्रस्तांना त्यांच्या जीवनात मोठ्या हिमतीने उभे करण्यासाठी सोनू चा हा पाठींबा नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Web Title: Sonu Sood came forward to help the relatives of the victims of the Odisha accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.