उपचार सुरु असेल्या महिलेला तातडीने इंजेक्शनची होती गरज, सोनू सूदने थेट रुग्णालयात पाठवत केली मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 20:08 IST2021-05-06T20:00:14+5:302021-05-06T20:08:24+5:30
कोरोना काळात जनतेसाठी देवदूत ठरलेल्या सोनू सूदचे करावे तितके कौतुक कमीच आहे. गेल्या वर्षीपासून सुरु झालेला सोनू सूदच्या मदतीचा ओघ आजही कायम आहे.

उपचार सुरु असेल्या महिलेला तातडीने इंजेक्शनची होती गरज, सोनू सूदने थेट रुग्णालयात पाठवत केली मदत
देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दररोज वाढत असून रोज मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकिय व्यवस्था अपुरी पडत आहे. इंजेक्शन, बेड्स आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. गरजुंसाठी बेड्स आणि औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी सोनू सोदूनेदेखील पुढाकार घेतला आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये अभिनेता सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. जसे जमेल तशी सोनू सूद प्रत्येकाला मदत करताना दिसतोय. गेल्या वर्षभरापासून तो फक्त 5 तास झोपतो आणि 18 तास काम करतोय.
Injection delivered. ☑️
— sonu sood (@SonuSood) May 6, 2021
Wishing a speedy recovery🇮🇳@SoodFoundationhttps://t.co/LDC13pXH86
नुकतेच पंजाबमध्ये राहणा-या रुपा दळवी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तातडीने त्यांना इंजेक्शनची गरज होती. याबाबत सोनू सूदला ट्विट करण्यात आले.नेहमीप्रमाणे सोनू सूदने वेळेआधीच उपचारासाठी लागणारे इंजेक्शन उपलब्ध करुन दिले.
पुन्हा एकदा सोनू सूदचे चाहते कौतुक करत आहेत. कोरोना काळात जनतेसाठी देवदूत ठरलेल्या सोनू सूदचे करावे तितके कौतुक कमीच आहे. गेल्या वर्षीपासून सुरु झालेला सोनू सूदच्या मदतीचा ओघ आजही कायम आहे. सोनूदेखील निस्वार्थपणे जनतेची मनोभावे सेवा करताना दिसतो. परिस्थिती खूप भयावह आहे. कृपया घरात राहा, मास्क घाला आणि स्वतःला संसर्ग होण्यापासून वाचवा,' असे सोनू जनतेला नेहमीच आवाहन करताना दिसतो.
Video : मदतीची आस! सोनू सूदच्या घराबाहेर लोकांची गर्दी; नेटकरी म्हणाले, हाच पंतप्रधान हवा
मुंबईत लॉकडाऊन आहे. पण अशास्थितीत लोक सोनूच्या घराबाहेर मदतीच्या प्रतीक्षेत गर्दी करत आहेत. सोनूकडे नक्की मदत मिळेल, या आशेने काही लोक त्याच्या घरी पोहोचले. सोनूने या लोकांना निराश न करता, त्यांच्या समस्या ऐकून घेत त्यांना मदतीचे आश्वासन दिले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.मदतीच्या आशेने आलेले हे लोक सोनूला आशीर्वाद देतानाही दिसत आहेत.
आम्हा सर्वांचे आशीर्वाद व प्रार्थना तुमच्यासोबत आहेत सर, देव तुमचे भले करो, अशा शब्दांत हे लोक सोनूला आशीर्वाद देत आहेत. तूर्तास सोनूच्या घराबाहेरचा लोकांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.