बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 16:18 IST2025-09-01T16:17:49+5:302025-09-01T16:18:23+5:30

माझं लहानपणीचं आवडतं गाणं... सोनू निगमच्या गाण्याचा चाहता आहे वरुण धवन,आता त्याच्याच सिनेमातून पुन्हा येतंय 'बिजुरिया'

sonu nigam and varun dhawan dance on bijuria song after 25 years video viral | बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...

बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...

वरुण धवन (Varun Dhawan) आणि जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) आगामी 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या सिनेमात सोनू निगमचं (Sonu Nigam) आयकॉनिक 'बिजुरिया' गाणं पुन्हा रिलीज करण्यात येणार आहे. २५ वर्षांपूर्वी २००० साली सोनू निगमने 'बिजुरिया' अल्बम रिलीज केला होता. यातील 'बिजुरिया' गाण्यावर त्याने दमदार डान्सही केला होता. आता इतक्या वर्षांनी सोनू निगमने वरुण धवनसोबत या गाण्यावर ठेका धरला. 

वरुण धवनने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो गायक सोनू निगमसोबत 'बिजुरिया' या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसतो. गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहेत. यासोबत वरुणने कॅप्शनमध्ये लिहिले, "माझं लहानपणीचं आवडतं गाणं. शाळेत या गाण्यावर डान्स करण्यापासून ते भावाच्या लग्नात परफॉर्म करण्यापर्यंत. हे माझं सर्वात आवडीचं गाणं राहिलं आहे. आता ३ सप्टेंबर रोजी हे गाणं पुन्हा रिलीज होत आहे."


वरुण आणि सोनूचा हा व्हिडिओ चाहत्यांना भलताच आवडला आहे. सगळेच सोनूच्या जुन्या गाण्याच्या आठवणीत रमले आहेत. शशांक खेतान दिग्दर्शित 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' सिनेमात वरुण धवन, जान्हवी कपूर, रोहित सराफ आणि सान्या मल्होत्रा यांची मुख्य भूमिका आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे. धर्मा प्रोडक्शन्स अंतर्गत सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. २  ऑक्टोबर रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.

Web Title: sonu nigam and varun dhawan dance on bijuria song after 25 years video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.