कपिल शर्मा फिरंगी या चित्रपटासाठी गाणार हे गाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 16:02 IST2017-09-28T10:32:35+5:302017-09-28T16:02:35+5:30

कपिल शर्मा हा एक चांगला कॉमेडियन असण्यासोबत एक चांगला सिंगर देखील आहे. त्याचा आवाज खूपच चांगला आहे. तुम्हाला माहीत ...

This song will be sung for the film Kapil Sharma Firangi | कपिल शर्मा फिरंगी या चित्रपटासाठी गाणार हे गाणे

कपिल शर्मा फिरंगी या चित्रपटासाठी गाणार हे गाणे

िल शर्मा हा एक चांगला कॉमेडियन असण्यासोबत एक चांगला सिंगर देखील आहे. त्याचा आवाज खूपच चांगला आहे. तुम्हाला माहीत आहे का कपिल मुंबईत कॉमेडियन नव्हे तर एक गायक बनण्यासाठी आला होता. पण द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमामुळे स्टँड अप कॉमेडियन म्हणून त्याने आपले प्रस्थ निर्माण केले. कॉमेडी नाईट्स विथ कपिल, द कपिल शर्मा शो या कार्यक्रमामुळे तर त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. आता एक कॉमेडीयन म्हणून प्रसिद्धी मिळवल्यानंतर तो त्याच्या गायनाच्या प्रेमाकडे वळला आहे.
कपिल शर्माला नुकतंच बेंगलुरूच्या रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले असून त्याची तब्येत देखील सुधारत आहे. त्याची तब्येत चांगली असल्याने आता त्याने मुंबईत त्याच्या फिरंगी या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनला देखील सुरुवात केली आहे. सध्या तो त्याच्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात कपिल मुख्य भूमिकेत आहे. पण त्याचसोबत तुम्हाला माहीत आहे का या चित्रपटात त्याने गाणे देखील गायले आहे. राहत फतेह अली खान यांचे साहेबा हे गाणे कपिलच्या आवाजात या चित्रपटासाठी रेकॉर्ड करण्यात आले असल्याचे मुंबई मिरर या वर्तमानपत्राने त्यांच्या बातमीत म्हटले आहे. कपिलला हे गाणे खूपच आवडते. राहत फतेह अली खान यांचा तर तो खूप मोठा फॅन आहे. त्यामुळे हे गाणे गायला त्याला खूपच आवडले. हे गाणे एखाद्या स्टेजवर चित्रीत करण्याचा दिग्दर्शकाचा विचार आहे. चांगले लायटिंग करून कोक स्टुडिओप्रमाणे या गाण्याचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे या कार्यक्रमाचे दिग्दर्शक राजीव धिंगरा यांनी मुंबई मिरर वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात येणार आहे. पण याचे चित्रीकरण कधी करायचे याबाबत अद्याप तरी काहीही ठरलेले नाही. 
फिरंगी या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा काळ या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे सतलेज नदीच्या काळावर करण्यात आले आहे. 

Also Read : कपिल शर्माच्या फॅन्ससाठी खुशखबर ! लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Web Title: This song will be sung for the film Kapil Sharma Firangi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.