song out !नवा रंग, नवा साज...‘बादशाहो’चे ‘मेरे रश्के कमर...’ गाणे रिलीज!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2017 14:03 IST2017-07-14T08:33:52+5:302017-07-14T14:03:52+5:30
-और इंतजार की घडियाँ खत्म...!! होय, ‘बादशाहो’चे पहिले गाणे ‘मेरे रश्के कमर...’ आज रिलीज झाले. या गाण्याचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य काय तर अजय देवगण आणि इलियाना डिक्रूज या दोघांचा हॉट अंदाज.

song out !नवा रंग, नवा साज...‘बादशाहो’चे ‘मेरे रश्के कमर...’ गाणे रिलीज!!
-औ र इंतजार की घडियाँ खत्म...!! होय, ‘बादशाहो’चे पहिले गाणे ‘मेरे रश्के कमर...’ आज रिलीज झाले. या गाण्याचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य काय तर अजय देवगण आणि इलियाना डिक्रूज या दोघांचा हॉट अंदाज. एक रोमॅन्टिक सुफी ट्रॅक असलेले हे गाणे नव्या फ्लेवरसह ‘बादशाहो’मध्ये दिसणार आहे. तनिष्क बाग्चीने हे नव्या अंदाजात कंपोज केले आहे. नुसरत फतेह अली खान यांनी गायलेल्या या ओरिजनल गाण्याला नवा फिल देण्यासाठी म्युझिशियन्सची प्रशंसा करायलाच हवी. यात प्रदीप पंडीत आणि प्रोदिप्तो सेन गुप्ता यांची नावे आवर्जून नोंदवावी लागतील.
खरे तर इलियाना व अजयच्या हॉट केमिस्ट्रीची झलक आपण ‘बादशाहो’च्या टीजरमध्ये पाहिली आहेच. पण या गाण्यात अजय व इलियानावर तुमच्या नजरा अशा काही खिळतील की, त्या हटता हटणार नाहीत. गाण्यातील एका दृश्यात इलियाना अजयकडून बंदूक हिसकावून घेते आणि त्याचवेळी अजय तिला आपल्या जवळ ओढतो. हा सीन तुम्ही मिस करता कामा नये.
मिलन लुथरिया दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगणशिवाय इमरान हाश्मी, विद्युत जामवाल,इशा गुप्ता आणि संजय मिश्रा मुख्य भूमिकेत आहेत. ‘बादशाहो’ची कथा १९७५ च्या आणीबाणी पार्श्वभूमीवर रेखाटली गेली आहे. याकाळात भारतातील सोने एका गावातून दुसºया गावात नेले जात असताना काही लोक हे सोने लुटण्याचा कट रचतात, अशी ही कथा आहे. एका मुलाखतीदरम्यान मिलन लुथरिया यांना ‘बादशाहो’च्या चित्रपटाची कथा कशी सुचली, यामागेही एक सुरस कथा आहे. १९९९ मध्ये राजस्थानात ‘कच्चे धागे’चे शूटींग सुुरू असताना मिलन यांना ही कथा ‘क्लिक’ झाली होती. या चित्रपटातही अजय देवगण लीड रोलमध्ये होता. म्हणजेच २० वर्षांपूर्वी ‘क्लिक’ झालेली कथा ‘बादशाहो’च्या निमित्ताने आपल्याला पडद्यावर पाहायला मिळणार आहे.